आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LK Advani Unhappy With BJP's Handling Of Karnataka Polls

कर्नाटक जिंकलो असतो तरच आश्चर्य वाटले असते : अडवाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभव हा आश्चर्यजनक नाही. याउलट आम्ही जिंकलो असतो तर आश्चर्य वाटले असते, असे खडे बोल ज्येष्ठ भाजप नेते लालकृष्ण अडवाणी सुनावले आहेत. हा निकाल भाजपसाठी धडा आहे. त्याचप्रमाणे सामान्य माणसाची दखल न घेतल्यास अशी स्थिती ओढवू शकते, असा इशारा मतदारांनी कॉँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांना दिला आहे, असे अडवाणी यांनी आपल्या ब्लॉगवर नमूद केले आहे.

अडवाणी म्हणाले, केंद्रीय मंत्री पी.के. बन्सल आणि अश्विनीकुमार यांनी सोनिया गांधी यांच्या इशार्‍यावर राजीनामा दिला. पंतप्रधानांना स्वाभिमान असेल तर त्यांनी लोकसभेच्या निवडणुका लवकर घ्याव्यात. कर्नाटक निवडणूक हा भाजपप्रमाणे कॉँग्रेससाठीही धडा आहे.


तर राज्य गमवावेच लागेल
कर्नाटक निकालामुळेच कोलगेट व रेलगेट प्रकरणात कॉँग्रेसला मंत्र्यांचा राजीनामा घेणे भाग पडले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसर्‍या टप्प्यात विरोधकांच्या मागणीची दखल घेण्यात आली नाही. या प्रकरणाशी काही घेणेदेणे नसल्यासारखी सरकारची कार्यपद्धती होती. येदियुरप्पा यांच्या कार्यकाळात भाजपने त्याविरोधात पावले उचलली होती, सरकार चालवताना व्यावहारिक दृष्टिकोन स्वीकारला नाही, तर तुम्हाला राज्य गमवावेच लागेल.

कॉँग्रेसने आरोप फेटाळले
सोनिया गांधी यांनीच पंतप्रधानांच्या दोन मंत्र्यांना राजीनामे देण्यास भाग पाडल्याचे अडवाणी यांनी म्हटले आहे. कॉँग्रेस प्रवक्ते जनार्दन द्विवेदी यांनी मात्र, हा आरोप फेटाळला आहे. बन्सल आणि अश्विनीकुमार यांच्या राजीनाम्याचा निर्णय पंतप्रधान आणि सोनिया गांधी यांनी संयुक्तपणे घेतला असल्याचे ते म्हणाले.

येदियुरप्पांसाठी भाजपचे दरवाजे तूर्तास बंदच
येदियुरप्पा फॅक्टरचा फटका बसल्याचे उघड झाल्यानंतर त्यांच्या परतीचा प्रस्ताव तूर्त विचारात नाही, असे भाजपतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. येदियुरप्पा यांना पक्षात पुन्हा घेण्याचा प्रस्ताव आल्यास केंद्रीय नेतृत्व त्यावर निर्णय घेईल, असे भाजप प्रदेशाध्यक्ष प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. 224 सदस्यांच्या विधानसभेमध्ये 40 जागा जिंकून भाजप जेडीएससह दुसर्‍या क्रमांकावर राहिला. येदियुरप्पा यांच्या कर्नाटक जनता पक्षाला सहा जागा मिळाल्या असल्या तरी केजेपीने 10 टक्के मते मिळवली आहेत.