आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाक दहशतवाद्यांनी LOC वर भारताच्या सीमेत तयार केले 150 मीटर लांब भुयार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो : पल्लनवाला सेक्टरमध्ये आढळून आलेले भुयार)

जम्मू/नवी दिल्ली - भारत-पाक सीमेवर जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्‍तानी दहशतवाद्यांचे कारस्थान समोर आले आहे. जम्मू क्षेत्रातील संवेदनशील अशा पल्लनवाला सेक्टरमध्ये 22 ऑगस्ट रोजी सैन्याला 150 मीटर लांबीचे भुयार आढळून आले होते. या भुयाराचा 130 मीटर ते 150 मीटरचा भाग भारतीय सीमेतही आहे. आधी लष्कराने हे भुयार भारतीय सीमेत नसल्याचे म्हटले होते.

संरक्षण मंत्रलयाकडून मिळालेल्या माहितीनुसार नियंत्रण रेषेपासून (LOC) सुमारे 130 ते 150 मीटर अंतराचे भुयार भारतीय सीमेमध्येही आढळून आले आहे. अत्याधुनिक ग्राऊंड पेनेट्रेटिंग रडार आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने लष्कराला या भुयाराबाबत माहिती मिळाली आहे. मात्र. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय सीमेमध्ये जे भुयार आहे ते पूर्णपणे तयार झालेले नाही. तसेच यातून भारतीय सीमेत दहशतवादी प्रवेश करतील एवढी जागाही नाही.
विशेष म्हणजे हे भुयार जमिनीपासून सुमारे 20 फूट खाली, 4 फूट उंच आणि 3 फूट रूंद आहे. सुत्रांच्या मते हे भुयार दहशतवाद्यांची घुसखोरी, त्यांच्यासाठी शस्त्र पुरवठा किंवा अमली पदार्थांच्या तस्करीसाठी तयार करण्यात आले असू शकते. मात्र अद्याप यासंदर्भात कोणताही पुरावा मिळालेला नाही. भारताच्या दक्ष जवानांनी 22 ऑगस्टला सीमेवर गस्त घालताना हे भुयार शोधले होते. संरक्षण विभागाच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार गस्त घालणा-या जवानांना जमिनीवर काहीसा मऊपणा जाणवला. त्यानंतर त्यांनी रडार व इतर उपकरणांच्या मदतीने हे भुयार शोधले होते. पण भुयार पूर्ण होण्याआधीच जवानांनी त्याचा शोध लावला.
पुढे वाचा, जम्मू-काश्मीरच्या स्थानिकांना प्रशिक्षण देत आहेत दहशतवादी