आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local Body Elections In Ahmedabad, LK Advani Arrives To Cast His Vote

बिहार निवडणुकीनंतर भाजपमध्‍ये चेतना आली : लालकृष्‍ण अडवाणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
नवी दिल्ली - 'बिहार निवडणुकीनंतर पक्षात चेतना आली आहे. पण, अच्‍छे दिन यायला वेळ लागेल,'' असे प्रतिपादन भाजपचे ज्‍येष्‍ठ नेते लालकृष्‍ण अडवाणी यांनी आज (रविवार) केले. गुजरातच्‍या अहमदाबादमध्‍ये स्‍थानिक निवडणुकीत मदतान करण्‍यासाठी ते आले होते.
योग्‍य दिशेने गेले तर चांगले फळ मिळेल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या 'अच्छे दिन' आणि डाळीच्‍या भावांबाबत विचारलेल्‍या प्रश्‍नाचे उत्‍तर देताना ते म्‍हणाले, ''अच्‍छे दिन येतील. मात्र, त्‍यासाठी वेळ लागेल. दिशा योग्‍य असेल तर परिणाम चांगले असतील. आमचे नरेंद्र भाई संसदेत पंतप्रधान म्‍हणून चांगले काम करत आहेत. मी त्‍यांना गुजरातमध्‍ये काम पाहिलेले आहे. गुजरातमध्‍ये स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणुकीत लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे निकाल यावा'', असे ते म्‍हणाले.