आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabh Election Date News In Marathi, Election Commission Of India

लोकसभेचा बिगुल: देशभरात 9, महाराष्‍ट्रात 3 टप्प्यांत होणार मतदान

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई - बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने बुधवारी जाहीर केला. यानुसार देशभरात ऐतिहासिक म्हणजे 9 टप्प्यांत, तर महाराष्‍ट्रात 3 टप्प्यांत मतदान होईल. 7 एप्रिलपासून 12 मेपर्यंत मतदानाचे टप्पे पार पडल्यानंतर 16 मे रोजी मतमोजणी होणार आहे. या घोषणेबरोबरच आदर्श आचारसंहिताही लागू झाली आहे. विविध राज्यांतील लोकपालांची नियुक्ती मात्र निवडणूक आयोगाने आचारसंहितेच्या कक्षेबाहेर ठेवली आहे. मतदानाच्या पहिल्या व शेवटच्या टप्प्यात 35 दिवसांचे अंतर असून यंदा नवीन 9.1 कोटी मतदारांसह 81 कोटींहून अधिक म्हणजे युरोपातील 53 देशांची एकूण लोकसंख्या एकत्र केली तर त्याहीपेक्षा 10 कोटी अधिक मतदार आहेत.


राज्यात 6000 संवेदनशील केंद्रे
महाराष्‍ट्रातील सहा हजार मतदान केंद्रे संवेदनशील असून, 650 अतिसंवेदनशील केंद्र आहेत. नक्षलग्रस्त भागांमध्ये मतदान सुरळीत पार पडावे यासाठी स्वतंत्र नियोजन करण्यात आले आहे.
हेल्पलाइन : प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक विषयक तक्रारींसाठी www.eci.nic.in हे संकेतस्थळ कार्यान्वित असेल. तसेच प्रत्येक जिल्ह्यात एक टोल फ्री क्रमांकावर तक्रार करता येईल. आयएस अधिकारी नेमणार.


औरंगाबाद, जालन्यात 24 एप्रिलला मतदान
पहिला टप्पा - 10 एप्रिल
०बुलडाणा ०अकोला ०अमरावती (अ.जा.) ०वर्धा ०रामटेक (अ. जा.) ०नागपूर ०भंडारा-गोंदिया ०गडचिरोली-चिमूर (अ.ज.) ०चंद्रपूर ०यवतमाळ-वाशीम
०22 मार्च : उमेदवारी अर्जासाठी मुदत ०24 मार्च : छाननी ०26 मार्च : अर्ज मागे घेण्याची मुदत ०10 एप्रिल : मतदान.
सहा मुख्य वैशिष्ट्ये
*नऊ टप्प्यांत निवडणुका. 2009 मध्ये 7 टप्पे होते.
*आचारसंहिता 72 दिवसांपर्यंत. 2009 मध्ये 75 दिवस होती.
* 9 लाख 30 हजार मतदान केंद्रे. 2009 पेक्षा 30% अधिक
*निवडणुकीत नोटा व व्होटर स्लिपवर फोटोची सुविधा
* मतदार यादी नाव नोंदणीसाठी देशभर 9 मार्चला 9 लाख कँप.
*प्रथमच 20,600 ईव्हीएममध्ये मिळेल मतदारांना पोचपावती.


7.90 कोटी मतदार महाराष्‍ट्रात
4.18 कोटी - पुरुष मतदार
3.71 कोटी - महिला मतदार


दुसरा टप्पा- 17 एप्रिल
०अहमदनगर ०शिर्डी (अ. जा.)०हिंगोली ०नांदेड ०परभणी ०बीड ०उस्मानाबाद ०लातूर (अ. जा.) ०सोलापूर (अ.जा.) ०मावळ ०पुणे ०बारामती ०शिरूर ०माढा ०सांगली ०सातारा ०रत्नागिरी-सिंधुदुर्ग ०कोल्हापूर ०हातकणंगले


तिसरा टप्पा - 24 एप्रिल
०नंदुरबार (अ.ज.) ०धुळे ०जळगाव ०रावेर ०जालना ०औरंगाबाद ०दिंडोरी ०नाशिक ०पालघर ०भिवंडी ०कल्याण ०ठाणे ०मुंबई-उत्तर ०मुंबई-उत्तर पश्चिम ०मुंबई उत्तर पूर्व ०मुंबई उत्तर मध्य ०मुंबई दक्षिण मध्य ०मुंबई दक्षिण ०रायगड
०26 मार्च : अर्जांसाठी मुदत ०27 मार्च : छाननी
०29 मार्च : अर्ज मागे घेण्याची मुदत ०17 एप्रिल : मतदानाचा दिनांक.
०5 एप्रिल : अर्जांसाठी मुदत ०7 एप्रिल : छाननी
०9 एप्रिल : उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत
०24 एप्रिल : मतदान


मतदार नोंदणीसाठी 9 मार्चची संधी : अद्याप मतदार नोंदणी न करणा-यांना 9 मार्चपर्यंत अर्ज दाखल करता येतील.


2009 मधील पक्षीय बलाबल
काँग्रेस 206
भाजप 116
सपा 23
बसपा 21
तृणमूल 19
द्रमुक 18
जदयू 20
माकपा 16
बीजद 13
शिवसेना 11
एडीएमके09
एनसीपी09
अकाली04
इतर 58
एकूण - 543


2009 मधील स्थिती
262 यूपीए
121 इतर
160 एनडीए


मोदी पंतप्रधान होतील ?
बलस्थाने : विविध सर्वेक्षणांत भाजपला 200 ते 230 जागा मिळण्याचा अंदाज आहे. यामुळे विरोधक बिथरत आहेत.
उणिवा : 250 जागा असलेल्या दक्षिण, ईशान्येत भाजपचा प्रभाव नाही. थर्ड फ्रंटमुळे अनेक जागी तिरंगी लढत. यामुळे भाजपला फटका.
आव्हाने : मोदींसाठी केजरीवाल सर्वात मोठे आव्हान. दिल्ली-यूपी, हरियाणात तगडी लढत.


राहुल सत्ता राखतील ?
बलस्थाने : 200 जागा असलेली दाक्षिणात्य- ईशान्य राज्ये. ग्रामीण भागात गांधींचा प्रभाव.
उणिवा : भ्रष्टाचार, महागाई. 2009 मध्ये सर्वाधिक जागा देणा-या आंध्रात विरोध. यूपी-बिहार, बंगाल, तामिळनाडूत बिकट परिस्थिती.
आव्हाने : काँग्रेसला मोदी-केजरीवाल-थर्ड फ्रंट अशा तिन्ही बाजूंनी आव्हाने. सत्तेविरुद्ध लाट.


तिसरी, चौथी आघाडी डाव बिघडवणार?
आशा : तिस-या आघाडीतील 11
पक्षांच्या वर्चस्वाखालील 9 राज्यांत 258 जागा आहेत. त्रिशंकू परिस्थितीत तिसरी आघाडी सरकार स्थापन करू शकते. केजरीवाल व ममतांच्या पक्षाने 25 ते 30 जागा जिंकल्यास यूपीए-एनडीएचा खेळ बिघडू शकतो.
शक्यता : तिसरी आघाडी सत्तेत आल्यास पीएमपदाच्या खुर्चीसाठी एकच रण माजेल. मुलायमविरुद्ध मायावती, जयललितांविरुद्ध करुणानिधी असे पाय खेचण्याची स्पर्धा सुरू होईल. ममतांना डावे पक्ष अडवतील, तर केजरीवाल सर्वांचीच अडचण करू शकतात.


11 पक्षांचा तिसरी आघाडी
सपा, चारही डावे पक्ष, बीजेडी,
जदयू, जदसे, अण्णाद्रमुक, अगप, झाविमो यांचा समावेश आहे.
उरलेल्यांचा चौथी आघाडी
आम आदमी पार्टी, बसपा,
तृणमूल काँग्रेस, वायएसआर काँग्रेस, टीडीपी व इतर पक्ष.