आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Lok Sabha Adjourned Till Noon After Uproar Over Missing Files Of Coal Ministry

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिनव भारत संघटनेवरील बंदीची मागणी केंद्र सरकारने फेटाळली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली/ मुंबई - महाराष्ट्र शासनाने अभिनव भारत संघटनेवर बंदी घालण्याची केलेली मागणी केंद्र सरकारने फेटाळून लावली आहे. केंद्राचा हा दुर्दैवी निर्णय असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. तर, अभिनव भारत संघटनेच्या अध्यक्षा हिमानी सावरकर यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

एका वृत्तवाहिनीशी बोलताना सावरकर म्हणाल्या, अभिनव भारत ही गन्हेगारी संघटना नाही. आमच्या संघटनेला नाहक बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. आमचे कार्यकर्ते काही पिस्तूलं घेऊन फिरतात का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच, संघटना न्यायाच्या चौकटीत काम करणारी असल्याचा दावा केला.

जितेंद्र आव्हाड यांनी या संघटनेवर बंदी घालावी अशी मागणी लावून धरली होती. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येनंतर कट्टरपंथी हिंदूत्ववादी संघटनावर बंदीची मागणी जोर धरत आहे. त्यात अभिनव भारतचाही समावेश होता. या संघटनेची स्थापना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केली होती. 1952 मध्ये त्यांनी ही संघटना बर्खास्त केली होती. मात्र 2006 मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोटानंतर या संघटनेचे अस्तित्व दिसून आले. तेव्हा पासून या संघटनेवर बंदी घालण्याची मागणी केली जात आहे.

मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर अभिनव भारत संघटनेवर बंदी घालण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला होता. केंद्र सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेईल, असे त्यांनी म्हटले होते. मात्र, केंद्राने राज्याचा प्रस्ताव फेटाळून लावला आहे.