आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संसदेच्या दोन्ही सभागृहात गोंधळ, कामकाज दुपारी 12 पर्यंत स्थगित

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - यूपीए-2 आणि 15व्या लोकसभेच्या शेवटच्या अधिवेशनाला आज (बुधवार) सुरवात झाली असून गोंधळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज दुपारी 12 वाजतापर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
राज्यसभेचे कामकाज दुपारी 12 पर्यंत स्थगित करण्यात आले आहे. त्याआधी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांनी सर्वपक्षिय नेत्यांना अपिल केले होते, की संसदेत महत्त्वाच्या विधेयकांना संमत करण्यासाठी सहकार्य करावे. अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी, ज्या पद्धतीने विरोधीपक्षाची भूमिका आहे, त्यावरुन या अधिवेशनात एकही विधेयक मंजूर होणार नसल्याची शक्यता व्यक्त केली होती.
15 व्या लोकसभेचा कार्यकाळ संपायला साधारण एक महिना शिल्लक राहिला आहे. स्वातंत्र्यापासून आतापर्यंतच्या लोकसभेच्या कामकाजावर नजर टाकली तर 15 व्या लोकसभेत सर्वात कमी वेळ कामकाज चालले आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात 126 विधेयके प्रलंबित आहेत. त्यातील 72 विधेयके लोकसभेत तर 54 राज्यसभेत प्रलंबित आहेत.