आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता लोकसभा मतदारसंघांना आद्याक्षर क्रमांक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशभरातील लोकसभेचे सर्व म्हणजे 1 पासून 543 पर्यंतचे मतदारसंघ आद्याक्षरानुसार असावेत यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने हालचाली सुरु केल्या आहेत. 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीमध्ये देशभरातील मतदार संघ क्रमांक 1 ते 543 पर्यंतचे असतील यातून राष्ट्रीय एकात्मतेचे दर्शन होईल, असा विश्वास निवडणूक आयोगाला वाटतो.
अहमदनगरचे भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी लोकसभेचे देशभरातील मतदार संघ आद्याक्षरानुसार करावेत, अशी विनंती केली होती. खासदार गांधी यांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जूनपासून महिनाभरात निवडणूक आयोगाने चार बैठका घेतल्या त्यात या निर्णयावर दोन्ही बाजूने मते व्यक्त करण्यात आले असले तरी 1 ते 543 असे मतदार संघ निर्माण करण्यास अनुमती मिळविण्यात आली आहे. असे असले तरी ही प्रक्रिया प्राथमिक स्वरूपाची आहे. त्यावर आणखी काम करावे लागेल. आयोगाचे सचिव आशीष चक्रवर्ती यांनी बैठकीमध्ये आपण केलेली विनंती मान्य झाल्याचे खासदार गांधी यांना कळवले आहे.