आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Election News In Marathi, Election Commission Of India

एप्रिलच्या मध्यापासून रणधुमाळी, सात टप्प्यात होणार निवडणुका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी एप्रिलच्या दुसर्‍या आठवड्यापासून सुरू होण्याची शक्यता आहे. सहा किंवा सात टप्प्यांत या निवडणुका होऊ शकतात. पहिल्या टप्प्यातील मतदान 10 एप्रिलला होण्याचे अनुमान निवडणूक आयोगातील उच्चपदस्थ सूत्रांनी व्यक्त केले आहे. निवडणुकीच्या घोषणेसोबत सरकार व राजकीय पक्षांसाठी आदर्श आचारसंहिता लागू होईल.

सध्याच्या 15 व्या लोकसभेचा कार्यकाळ 1 जूनला संपत आहे. नव्या लोकसभेची स्थापना 31 मेपर्यंत करावी लागणार आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार, मतदान वेळापत्रकाला सध्या अंतिम रूप दिले जात आहे. सहा टप्प्यांत देशभरातील मतदान पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विशेष म्हणजे, सहा ते सात टप्प्यांत मतदान झाल्यास तो आतापर्यंतचे सर्वात दीर्घ कालावधी ठरेल.

आयोगाकडून याच आठवड्यात निवडणुकीच्या वेळापत्रकाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात नक्षलवाद्यांचा प्रादुर्भाव असलेल्या व ईशान्य भारतातील काही राज्यांत मतदान घेतले जाण्याची शक्यता आहे. तेलंगणसह आंध्र प्रदेश, ओडिशा आणि सिक्कीममध्ये लोकसभेसोबत विधानसभेच्याही निवडणुका पार पडणार आहेत.

निवडणूक खर्च मर्यादेत वाढ- यंदाच्या लोकसभा निवडणुकीत उमेदवार खर्चाची र्मयादा 40 लाखांवरून 70 लाख रुपये करण्यात आली आहे. मतदान यंत्रांवरील उमेदवारांच्या यादीत आता ‘वरीलपैकी कुणीही नाही’ (नोटा) या बटणाचा पर्यायही मिळणार आहे. याशिवाय इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनसह त्याचे कागदोपत्री रेकॉर्डही ठेवले जाणार आहे.