नवी दिल्ली- उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भाजपला लोकसभेच्या निवडणुकीत जोरदार यश मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. एबीपी न्यूज आणि नेलसन यांनी केलेल्या ताज्या सर्वेक्षणात या दोन्ही राज्यांत भाजपला 61 जागा मिळतील, असा अंदाज आहे. यूपीत 40 तर बिहारमध्ये 21 जागा भाजपला मिळतील, तर दुसरीकडे या दोन्ही राज्यात काँग्रेसला केवळ 13 जागा मिळतील असे दिसून येत आहे. सध्या चर्चेत असलेला केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला 1 जागा यूपीत मिळू शकते असे यात म्हटले आहे. 4 ते 15 फेब्रुवारीदरम्यान दोन्ही राज्यांतील सर्व मतदारसंघात हे सर्वेक्षण घेण्यात आले होते.
पुढे वाचा, बिहारमधील सर्वेक्षण ...