आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Lok Sabha Passes Maternity Bill, Increase Maternity Leaves From 12 Weeks To 26 Weeks.

वुमेन मॅटर्निटी लिव्ह बिल लोकसभेत मंजूर, महिलांना मिळणार साडेसहा महिन्यांची रजा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने देशातील नोकरदार महिलांना एक गिफ्ट दिले आहे. मॅटर्निटी लीव्ह बिल म्हणजेच प्रसुतकालीन रजा विधेयक काल (गुरुवारी) लोकसभेत अावाजी मतदानाने मंजूर करण्‍यात आले. यापूर्वी राज्यसभेत ऑगस्ट 2016 मध्ये हे विधेयक मंजूर करण्यात आले होते.

महिलांना प्रसुतीसाठी 12 आठवड्यांऐवजी आता 26 आठवडे अर्थात साडे सहा महिन्यांची प्रसुती रजा मिळणार आहे. देशभरातील जवळपास 18 लाख महिलांना या विधेयकामुळे फायदा होणार आहे. 

गरोदर महिलांना प्रसूतीच्या आधी स्वत:ची आणि त्यानंतरच्या काळात अापत्याच्या दैनंदिन पालनपोषणासाठी दिल्या जाणाऱ्या रजेत वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. प्रसूती रजा साडेसहा महिन्यांची करण्याबाबतचे लेखी पत्र कामगार मंत्रालयाला पाठवण्यात आले होते. त्यास कामगार मंत्रालयाने सहमती दर्शविली होती. त्यानंतर हे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आले आहे.

 मॅटर्निटी बेनिफिट अॅक्ट, 1961 नुसार, देशातील प्रत्येक नोकरदार महिलेला प्रसूतीच्या काळात आणि त्यानंतर अपत्याची देखरेख ठेवण्यासाठी रजा दिली जाते. याकाळात महिलांना पूर्ण वेतन देण्याचा नियम आहे.

मॅटर्निटी बेनिफिट (एमेंडमेंट) बिल, ऑगस्ट 2016 मध्ये राज्यसभेत मंजूर करण्‍यात आले होते. त्यानंतर लोकसभेत हे विधेयक सादर करण्‍यात आले. काल (गुरुवारी) 4 तासांच्या चर्चेनंतर  आवाजी मतदान घेऊन हे विधेयक मंजूर करण्यात आले.

10 पेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या संस्थांना हे विधेयक लागू आहे. पहिल्या दोन अपत्यांसाठी 26 आठवड्यांची प्रसूती रजा मिळणार आहे. याआधी ही रजा 12 आठवड्यांची होती.

तिसर्‍या अपत्यासाठी मिळेल 12 आठवड्यांची रजा...
पहिल्या दोन अपत्यांसाठी 26 आठवड्यांची प्रसूती रजा मिळणार आहे. याआधी ही रजा 12 आठवड्यांची होती. मात्र, तिसर्‍या अपत्यासाठी महिलांना केवळ 12 आठवड्यांच्या रजेचा लाभ घेता येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍या महिला कर्मचार्‍यांना 3 ते 6 महिन्यांचा कारावास आणि 5000 रुपये दंडांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

महिलांना मॅटर्निटी लीव्ह देणारा भारत जगात तिसरा...
- महिलांना मॅटर्निटी लीव्ह देणारा भारत हा जगातील तिसरा देश ठरला आहे. पहिल्या क्रमांकावर कॅनडा आहे. कॅनडामध्ये 55 तर दुसर्‍या क्रमांकावर असलेल्या नार्वेमध्ये महिलांना 44 आठवड्यांची मॅटर्निटी लीव्ह दिली जाते.

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...