आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lok Sabha Speaker Sumitra Mahajans Brother Arun Sathe Appointed On Sebi Board

सुमित्रा महाजन यांच्या बंधूची सेबीच्या सदस्यपदी नियुक्ती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एफटीटीआयच्या अध्यक्षपदी गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केल्यानंतर उठलेले वादळ शमण्यापूर्वीच भाजपप्रणीत केंद्र सरकारने पुन्हा एक वादग्रस्त नियुक्ती केली आहे. लोकसभेच्या अध्यक्षा सुमित्रा महाजन यांचे ज्येष्ठ बंधू अरुण साठे यांची भांडवली बाजारातील नियामक सेबीच्या सदस्यपदी नियुक्ती केली आहे. अर्थ मंत्रालयाने साठे यांना "पात्र' ठरवत या नियुक्तीला वैध ठरवले आहे. अरुण साठे हे भारतीय जनता पक्षाचे सक्रिय सदस्य असून त्यांची खरी नाळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जुळलेली आहे. त्यामुळे त्यांची नियुक्ती हे राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे मानले जात आहे. तथापि, साठे यांनी स्वत: म्हटले आहे की, "संघाचा माणूस' असणे यात काहीच वाईट नाही. व्यवसायाने वकील असलेले साठे यांची सेबीच्या सदस्यपदी तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली असून ते सेबीचे अंशकालीन सदस्य असतील.