आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखंड आंध्र प्रदेशच्या मुद्यावरून लोकसभा चारवेळा तहकूब

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अखंड आंध्र प्रदेशच्या मुद्यावरून शुक्रवारी लोकसभेत पुन्हा गदारोळ झाला. पाच दिवसांच्या निलंबनाच्या कारवाईनंतर टीडीपीचे पाच खासदार सभागृहात दाखल झाले. त्यानंतर अखंड आंध्रचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित करण्यात आला. त्यामुळे लोकसभा अनेकवेळा तहकूब करण्यात आली.


लोकसभेतील कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर अखंड आंध्रचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. या वेळी सीमांध्र भागातील टीडीपी व काँग्रेसच्या खासदारांनी त्याकडे सभागृहाचे लक्ष वेधले. त्यामुळे घोषणाबाजी करण्यात आली. गोंधळामुळे चार वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. दुपारी तीनच्या सुमारास कामकाजाला पुन्हा सुरुवात झाली. त्यावेळी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बाजू मांडली. त्यावेळी मात्र टीडीपीचे सदस्य काहीवेळ शांत राहिले. परंतु नंतर पुन्हा गदारोळाला सुरुवात झाली. आंध्रच्या खासदारांनी सोबत ‘अखंड आंध्र प्रदेश हवा’, ‘तेलुगू जनतेला न्याय द्या’ अशा आशयाचे फलक सभागृहात आणले होते.