आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Loksabha Election 2014 Shashi Tharoor Latest News In Marathi

सुनंदानंतर थरूर यांच्यावर चारित्र्याचे संकट; महिला मतदारांवरांवरच भिस्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तिरुअनंतपुरम् - केरळच्या तिरुअनंतपुरम् मतदारसंघात केंद्रीय मंत्री शशी थरूर यांची टक्कर पुन्हा एकदा माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे 85 वर्षीय ओ. राजगोपाल यांच्याशी आहे. तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले थरूर यांना आपल्या दुसर्‍या विजयाची खात्री आहे. राजगोपाल यांना केरळमध्येसुद्धा मोदी लाटेवर विश्वास आहे. इथे भाजपने एकही निवडणूक जिंकलेली नाही. झंझावाती प्रचारादरम्यान ‘भास्कर’ने या दोघा उमेदवारांशी चर्चा केली.
शशी थरूर
काँग्रेस उमेदवार
जागा मिळतील, पण सत्ता भाजपची नसेल
तिरुअनंतपुरम् हे देशाच्या सर्वात मोठ्या साक्षर राज्यातील राजधानीचे शहर आहे. उघड आहे की, लोक विचारपूर्वक मतदान करतील. प्रतिमा खराब करणार्‍या गोष्टींवर केरळचे लोक मतदान करणार नाहीत.
शरद पवार म्हणत आहेत, काँग्रेस दुसर्‍या क्रमांकापर्यंत जाऊन थांबेल. सर्वेक्षणसुद्धा भाजपच्या बाजूने आहे, तुम्ही काय म्हणाल?
पवारांचे गणित मला माहीत नाही. परंतु हे गृहीत जरी धरले की, भाजप सर्वात मोठी पक्ष म्हणून निवडून आला, तरी त्यांचे सरकार बनणार नाही. काँग्रेसच्या संख्येवर जाऊ नका. लक्षात घ्या, 2004 मध्ये काँग्रेसने 145 जागांवर देखील सरकार बनवले होते. सर्वेक्षणसुद्धा भाजपच्या बाजूने आकडे सांगत आहेत. मेपर्यंत वाट पहा. सत्य समोर येईलच.
मग यूपीए सरकारच्या लक्षावधी, कोट्यवधींचे घोटाळे लोक विसरतील?
देशाचा कोणताही राजकीय पक्ष भ्रष्टाचारापासून निष्कलंक नाही. पण जो समोर असतो, आपण त्याला लक्षात ठेवतो. एनडीएचा शवपेटी खरेदी घोटाळा तुम्ही का विसरता? कोणतीही गडबड उघड झाल्यावर काँग्रेसने कारवाई केली. कारण, कोणत्याही घोटाळ्यांमधील जे आहे ते सत्य बाहेर यावे, यासाठी सीबीआय आणि सीएनजीला काम करण्याचे पूर्ण स्वातंत्र्य नेहमीच राहिले.
राहुल यांचा जोर कुठे आहे? उत्तरप्रदेशात काँग्रेसचे लोक प्रियांका गांधींना पुढे आणण्याबद्दल चर्चा करतात.
प्रियांकाबद्दल काहीही बोलणार नाही. रहुल यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव आहे मला. काँग्रेला सशक्त नेतृत्व देण्यात ते सक्षम आहेत. समजदार युवा नेते आहेत. देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी आणि नियोजन त्यांच्याकडे आहे.
तुम्हाला वाटते, राहुल गांधींकडे पाहून तरुणांमध्ये उत्साह आहे?
गेल्या निवडणुकीत 75 टक्के नव्या मतदारांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले होते. यावेळीसुद्धा तरुणांमध्ये त्यांचा दिसणारा परिणाम नाकारता येणार नाही. राहुल स्वभावाने संयमी आहेत. युवा त्याचा विचार नक्कीच करतील.
सुनंदा मृत्यूच्या मुद्यावर तुम्ही चर्चेत होता, काही बोलणार त्याच्यावर?
ती एक दुर्दैवी घटना होती. सुनंदा या निवडणूक अभियानात दोन महिने केरळमध्ये राहण्याच्या तयारीत होती. मी एवढेच सांगेन की, ज्या लोकांना माझ्या कामात दोष काढता येत नाही, अशा लोकांनी सुनंदाच्या निमित्ताने माझ्या चारित्र्याच्या हत्येचा अयशस्वी प्रयत्न केला. त्यांना एक संधी मिळाली. मला या घडीला सुनंदाची खूप आठवण येते. ती क्षणोक्षणी माझ्यासोबत आहे. याची मला सतत जाणीव आहे.
पुढील स्लाइडमध्ये, महिलांनी जिंकून दिले; आता त्याच हरवतील