आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लोकसभेसाठी उमेदवारांच्या खर्चाची मर्यादा 70 लाख!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारांसाठी खर्चाची मर्यादा 40 लाखांवरून 70 लाख रुपये केली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाच्या सूत्रांनुसार राज्याचे क्षेत्र व मतदारसंघांची व्याप्ती विचारांत घेऊन याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो.

गोव्यासारख्या राज्यात उमेदवारांना तुलनेने कमी क्षेत्रात प्रचार करावा लागतो. अशा राज्यांत खर्चाची मर्यादा कमी असेल. यासंबंधी आयोगाने अंतिम निर्णय घेतला नसला तरी चर्चा पूर्ण झाली आहे. येत्या आठवड्यातच निर्णय होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणुकीसाठी खर्चाची ही मर्यादा 16 लाखांवरून 28 लाख रुपये होऊ शकते. निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकार्‍यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत राजकीय पक्षांनी खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी केली होती.