आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LOP Is Crucial Post Cant Be Ignored Supreme Court

विरोधी पक्षनेते पद महत्त्वाचे, सरकारला दुर्लक्ष करता येणार नाही - सुप्रीम कोर्ट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - लोकसभेत विरोधी पक्षनेते पद अतिशय महत्त्वाचे आहे. सत्ताधार्‍यांविरोधात विरोधकांचा तो 'आवाज' असतो. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शुक्रवारी लोकपाल कायद्यावरील एका याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने विरोधी पक्षनेत्याचा मुद्दा उपस्थित केला. लोकपाल कायद्यानुसार लोकपालाची निवड करण्यार्‍या समितीमध्ये विरोधी पक्षनेता हवा असतो. मात्र, गेल्या आठवड्यात लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी काँग्रेसकडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे सांगत विरोधी पक्षनेतेपद देण्यास नकार दिला होता.
सरन्यायाधीश आर. एम. लोढा यांच्या नेतृत्त्वाखाली पीठासमोर झालेल्या सनुवाणीत विरोधी पक्षेनेत्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. न्या्यालयाने स्पष्ट केले की, जे सदस्य सत्तेत नाहीत, त्यांचा आवाज विरोधी पक्षनेता असतो. घटनाकारांनी असा विचारच कधी केला नसेल, की अशी परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे न्यायालयाला चिंता वाटत आहे, की विरोधी पक्षनेत्याशिवाय लोकपालाची निवड होईलच कशी.
अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी स्पष्ट केले, की संसदेत विरोधी पक्षनेतेपदासाठी किमान 10 टक्के जागा जिंकणे आवश्यक असते. त्यामुळे या लोकपाल निवड समितीमध्ये विरोधी पक्षनेतेपदाची जागा रिक्त राहील. न्यायालयाने अॅटर्नी जनरल यांना चार आठवड्यात या बद्दलची माहिती देण्यास सांगितले आहे.
पुढील सुनावणीवेळी विरोधी पक्षनेतेपदाचा अन्वयार्थ लावला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसने 16 व्या लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद पक्षाचे गटनेते मलिक्कार्जून खरगे यांना देण्याची मागणी केली होती. मात्र, लोकसभा अध्यक्षा महाजन यांनी नामंजूर केली होती. त्यांनी त्यांच्या निर्णयाबाबत सांगितले होते, की मी सर्व नियम आणि परंपरांचा अभ्यास केला आणि त्यानंतर हा निर्णय घेतला आहे.
काँग्रेसने प्रथमपासून आमचा पक्ष संख्याबळाने क्रमांक दोनवर असल्याने विरोधी पक्षनेतेपद देण्याची मागणी लावून धरली होती. काँग्रेसला लोकसभेत 44 जागा मिळाल्या आहेत.