आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lotus Temple New Delhi Is Remarkable Architect Building To Must Visit

अभियांत्रिकीचे आश्चर्य आहे लोटस टेम्पल, एकाचवेळी 2500 लोक करु शकतात ये-जा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली - 15 सप्टेंबर रोजी देशात इंजिनिअर्स डे साजरा होत आहे. त्यानिमीत्त भारतातील अभियांत्रिकीचे वैशिष्ट्य ठरलेली काही नमुने आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. दिल्लीतील लोट्स टेम्पल हे त्यापैकीच एक. भारतीय अभियांत्रिकचा अजोड नमुना म्हणून म्हणून या मंदिराकडे पाहिले जाते. 1986 मध्ये हे मंदिर बांधण्यात आले आहे. तेव्हापासून याची देश विदेशात ख्याती आहे. दिल्लीच्या कालकाजी येथेल हे मंदिर आपल्या अनोख्या आकारामुळे कायम आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. दिल्लीची सफर करण्यासाठी आलेल्यांसाठी हे मंदिर महत्त्वाचे पर्यटन स्थळ ठरत आले आहे.
मंदिराची अनोखी वास्तूकला
1 - या मंदिराच्या डिझाइनपासून संपूर्ण मंदिर तयार होण्याला 10 वर्षांचा काळावधी लागला आहे.

2 - मंदिराचे आर्किटेक्ट मुळचे इराणचे मात्र कॅनडामध्ये स्थायिक झालेले आर्किटेक्ट फरिबोज सहबा आहेत.

3 - या मंदिराच्या निर्मीतीसाठी हजारो हात काम करत होते. त्यात 800 पेक्षा जास्त इंजिनिअर, तंत्रज्ञ, कामगार आणि कलाकारांचा समावेश होता.

4 - हे मंदिर बाहेरून अर्धोन्मलित कमल पुष्पासारखे दिसते. यात संगमरवराच्या 27 पाकळ्या आहेत.

5 - या 27 पाकळ्या तीन रांगांमध्ये आहेत. पहिल्या दोन रांगा या मंदिराच्या मध्य भागाकडे झुकलेल्या आहेत. तर तिसर्‍या रांगेतली पाकळ्या या बाहेरच्या बाजून झुकलेल्या आहेत.

6 - तिसर्‍या रांगेतील पाकळ्या या मंदिराच्या सेंट्रल हॉलच्या दरवाजाच्या कॅनोपीचे काम करतात.

7 - या मंदिराच्या सेंट्रल हॉलला 9 दरवाजे असून त्यात एकाचवेळी 2500 लोक ये-जा करु शकतात.

8 - मंदिराच्या बाहेर झुकलेल्या पाकळ्यांसोबत 9 छोटी-छोटी तळी आहेत. त्यामुळे 40 मीटर उंच हे मंदिर लांबून पाहिले असता तलावामध्ये कमळाचे फूल उमलल्या सारखे भासते.

लोट्स टेम्पलची ख्याती देश-विदेशात
1986 मध्ये निर्माण करण्यात आलेल्या या मंदिराच्या अनोख्या शैलीमुळे हे देश-विदेशात प्रसिद्ध आहे. या मंदिराला आतापर्यंत सात कोटी लोकांनी भेट दिली आहे.
भारतामध्ये कमळाला असलेल्या महत्त्वामुळे त्याचा आकार
हे मंदिर बहाई समाजाचे आहे. या मंदिरात येण्यासाठी मात्र, कोणत्याही धर्माच्या लोकांना बंदी नाही. आर्किटेक्ट फरिबोज यांना जेव्हा मंदिराचे काम देण्यात आले तेव्हा त्यांनी भारतात कमळ पुष्पाला असलेले महत्त्व लक्षात घेऊन मंदिराला त्याचा आकार देण्याचे निश्चित केले. कमळ हे प्रेम, शांती आणि शुद्धतेचे प्रतिक मानले जाते.

पुढील स्लाइडमध्ये दिल्ली आणि दुसर्‍या एकमेव लोटस टेम्पलेची छायाचित्रे..