आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेधडक मुलगा आणि लाजरी मुलगी, फिल्मी आहे या नेत्याची प्रेम कहाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो- मुख्तार अब्बास नकवी आणि सीमा नकवी.)
नवी दिल्ली- माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी आणि त्यांची पत्नी सीमा नकवी यांची लव्हस्टोरी एखाद्या बॉलिवूड चित्रपटापेक्षा काही कमी नाही. कॉलेजच्या दिवसांमध्ये नकवी विद्यार्थी नेते होते तर सीमा अगदी लाजऱ्या स्वभावाच्या होत्या. कॉलेजमधील एखाद्या मुलासोबत सीमा बोलतही नसे.
दोघांचे स्वभाग अगदी वेगवेगळे आहेत. त्यांची प्रेम कहाणीसुद्धा खुप रंजक आहे. नकवी मुस्लिम कुटुंबातील तर सीमा एका हिंदू परिवारातील आहेत. या प्रेम कहाणीचे साक्षिदार आहेत अलाहाबाद विद्यापिठाच्या भींती. येथून ही कहाणी सुरू झाली. यासंदर्भात नकवी सांगतात, की चालता चालता असेच कुणी तरी भेटले. त्यानंतर कहाणी घडत गेली. याला पहिल्या नजरेतील प्रेम म्हणता येईल.
1982 मध्ये हे प्रेमप्रकरण सुरू झाले. सीमाच्या परिवाराने दोघांच्या प्रेमाला विरोध केला होता. सीमाच्या आईचा याला खुप विरोध होता. त्यांनी सीमा यांना नकवी यांना भेटू नये असेही म्हटले होते. तरीही काही तरी कारण देऊन सीमा नकवी यांना भेटायला जात होत्या. अखेर त्यांच्या प्रेमाला यश आले. सीमा यांच्या आईने लग्नासाठी होकार दिला.
3 जून 1983 रोजी नकवी आणि सीमा यांनी लग्न केले. दोघांनी तीन पद्धतीने लग्न केले. सर्वांत आधी कोर्टात रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यानंतर मुस्लिम पद्धतीने लग्न केले. अखेर हिंदू पद्धतीने लग्न करुन सर्वधर्मसमभावाचा आदर्श घालवून दिला. नकवी कुटुंबीयांनी सीमाचा स्वीकार केला. तिला अगदी मुलगीसारखे वागवले. सीमा दुसऱ्या धर्मातील आहेत, असे त्यांना कधीही जाणवू दिले नाही. त्यांच्या कुटुंबात दिवाळी आणि ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दोघांना अरशद नावाचा मुलगा आहे.

पुढील स्लाईडवर मुख्तार अब्बास नकवी आणि सीमा यांची छायाचित्रे....