आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमीयुगुल विवाहबद्ध झाल्यावरून छत्तीसगडमध्ये जातीय तणाव; हिंसेत अनेक जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धमतरी- छत्तीसगडमधील धमतरीमध्ये एक प्रेमीयुगुल विवाहबद्ध झाल्यावरून तणाव निर्माण झाला आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर धमतरीमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्‍यात आला आहे. जिल्ह्यातीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस नि‍रीक्षकांनी रात्रभर पेट्रोलिंग केल्याची माहिती मिळाली आहे.

काय आहे प्रकरण:
धमतरी येथील एक प्रेमीयुगुल एसडीएम ऑफिसात आपला जबाब नोंदवण्यासाठी आले होते. परंतु, तेथे आलेल्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. पोलिसांनी सगळ्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. याची माहिती मिळताच पोलिस ठाण्याबाहेर गर्दी जमली. पाहाता पाहाता तणाव वाढतच गेला. शहरभर अफवा पसरल्याने बाजारपेठेतील दुकानदारांनी दुकाने बंद केली. एएसपी, एसडीएमसह इतर अधिकारी पोलिस ठाण्यात दाखल झाले. अधिकार्‍यांवर जमावाने दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. यात पोलिसांसह अनेक जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सोशल मीडियावर अफवा पसरल्याने बिघडली परिस्थिती....
एसडीएम ऑफिसात दोन गटात झालेल्या हाणामारीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आले. नंतरच सर्वत्र अफवा पसरली. जनतेने अफवांवर विश्वास ठेऊ नका, प्रशासन आणि पोलिस विभागातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून पाहा, संबंधित फोटो...