आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Love Story Of Aam Adami Party President Arvind Kejriwal And Sunita Kejriwal

केजरींची Love Story, नागपुरात जुळले प्रेम, व्यक्त करण्यास लागले 4 महिने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फोटो:अरविंद केजरीवाल आणि त्यांची पत्नी सुनीता केजरीवाल)

दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) भाजपसह कॉंग्रेसचा सुपडा साफ केला आहे. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची संधी पुन्हा एकदा अरविंद केजरीवाल यांना मिळणार आहे.

एरव्ही विरोधकांवर सडकून टीका करणारे आणि गौप्यस्फोट करणार्‍या केजरीवालांना 'दिल की बात' सांगायला तब्बल चार महिने लागले होते. केजरीवाल यांचा प्रेमविवाह असून त्यांची पत्नी सुनीता यांना प्रपोज करण्‍यासाठी त्यांना चार महिने लागले होते.

वाचा, अरविंद केजरीवाल आणि सुनीता केजरीवाल याची 'लव्हस्टोरी'...

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यासोबत भ्रष्टाचाराविरोधात सुरु झालेल्या लढाईत उतरलेले अरविंद केजरीवाल यांनी राजकारणात प्रवेश केला. एवढेच नव्हे तर 49 दिवसांचे मुख्यमंत्री म्हणून दिल्लीचे प्रशासनाने नेतृत्त्व केले होते. माजी भारतीय राजस्व अधिकारी (आयआरएस) असलेले अरविंद केजरीवाल याचे ट्रेनिंगदरम्यान सहकारी सुनिता यांच्याशी प्रेम जुळले. केजरीवाल यांचे एकतर्फी होते, असे या प्रकरणात म्हणता येणार नाही. सुनिता यांच्या मनातही केजरीवाल यांनी घर केले होते. मात्र, सुनिता यांना 'दिल की बात' सांगण्यासाठी केजरीवाल यांना तब्बल चार महिन्यांचा कालावधी लागला. नागपूर येथील ट्रेनिग अकादमीच्या बगीच्यात केजरीवाल दाम्पत्याने एकमेकांना प्रपोज केले होते. नंतर काही दिवसांतच दोघे विवाहबद्ध झाले होते.

अरविंद आणि सुनिता यांची पहिली भेट आयआरएस परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर नागपूर येथील राष्ट्रीय प्रशासनिक अकादमीत झाली. आपला जीवनसाथी प्रामाणिक असावा, असे सु‍निता यांना वाटायचे. अरविंद केजरीवाल यांचा स्वभाव सुनिता यांच्या इच्छेनुरुप आहे.

अरविंद आणि सुन‍िता नागपूरमधील अकादमीत दररोज तासंतास चर्चा करायचे. नेहमी सोबत राहायचे. मात्र, सुनिता यांना 'द‍िल की बात' सांगयला अरविंद केजरीवाल यांना खूप दिवस लागले.
सुनीता या दिल्लीतील असून अरविंद हे हरियाणातील (हिसार) रहिवासी आहे. एकाच जातीचे असल्याने त्यांच्या विवाहाला कोणी आडकाठी घातली नाही. ऑगस्टमध्ये साखरपुडा आणि नोव्हेंबर 1994 मध्ये दोघे विवाहबद्ध झाले. 1995 मध्ये ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर केजरीवाल दाम्पत्य दिल्लीत स्थायिक झाले. एका वर्षात मुलगी हर्षिताचा जन्म झाला. 2001 मध्ये मुलगा पुलकित याचा जन्म झाला.
समाजकार्याची आवड असलेले केजरीवाल यांनी आयआरएसची नोकरी सोडली. सुनीता सध्या प्रशासकीय सेवेत कार्यरत आहेत. केजरीवाल यांनी नोकरी सोडल्यानंतर काही दिवसात एक एनजीओ सुरू केला. नंतर अन्ना हजारे यांच्या आंदोलनात सहभाग घेतला. अन्ना हजारे यांच्यापासून विभक्त होऊन केजरीवाल यांनी स्वत: आप आदमी पक्षाची पायाभरणी करून दिल्लीचे मुख्यमंत्री बनले. त्यातही अनेक नाट्यमय घडामोडी घडून 49 दिवसांतच केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. आता पुन्हा मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत केजरीवाल सगळ्यात पुढे असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून बघा, अरविंद आणि सुनिता केजरीवाल यांची छायाचित्रे...