नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद
केजरीवाल यांचा आज 16 ऑगस्ट रोजी वाढदिवस आहे. अरविंद
केजरीवाल यांचा जन्म हरियाणामधील हिसारमध्ये झाला. अण्णा हजारे यांच्या सोबत भ्रष्टाचाराची लढाई लढता लढता केजरीवाल यांनी राजकारणामध्ये प्रवेश केला. दिल्ली विधानसभेच्या निवडणूकीत बहूमताने विजय मिळवून मुख्यमंत्री पदाची धुरा
आपल्या हाती घेतली. आपल्या संवादाच्या बळावर विरोधकांना सतत परेशान करणारे केजरीवाल यांना आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी मात्र अनेक महिने लागले.