आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

LPG सिलेंडरच्या दरात वाढ, हवाई प्रवास होऊ शकतो महागडा; एअर फ्यूल झाले महाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पेट्रोलियम मंत्रालयाने रविवारी हवाई इंधनाच्या दरात 6 टक्के वाढ केली आहे. दोन महिन्यात तिसऱ्यादा ही दरवाढ झाल्याने आता हवाई प्रवास महाग होऊ शकतो. दुसरीकडे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडर दरात दीड रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता अनुदानित सिलेंडर महागला आहे.
 
14 महिन्यात 69 रुपयांनी वाढले सिलेंडरचे दर 
- पेट्रोलियम मंत्री धमेंद्र प्रधान यांनी 31 जुलैला लोकसभेत सांगितले की सरकारने पेट्रोलियम कंपन्यांना सबसिडी असणाऱ्या सिलेंडरची किंमत 4 रुपयांनी वाढविण्यास सांगितले आहे. मार्च महिन्यापर्यंत सबसिडी समाप्त करण्यासाठी असे सांगण्यात आले आहे.
- त्यानंतर 1 अॉगस्टला सिलेंडरचा दर 2 रुपये 31 पैशांनी तर 1 सप्टेंबरला सिलेंडरचा दर 7 रुपयांनी वाढविण्यात आला. जुलै 2016  नंतर सिलेंडरच्या दरात आतापर्यंत 69 रुपये 50 पैसे एवढी वाढ कऱण्यात आली आहे.
 
पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती
 
बातम्या आणखी आहेत...