आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • LPG Cylinder Subsidy Deposit To Consumer Bank Account

येत्या एक जूनपासून थेट बँक खात्यात जमा होणार गॅस सबसिडी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- घरगुती गॅस सिलिंडरवर सरकारतर्फे देण्यात येणारी सबसिडी आता थेट ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. ही महत्वाकांक्षी योजना आता 15 मे ऐवजी एक जूनपासून कार्यान्वीत केली जाणार असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे. यापूर्वी अर्थ मंत्रालयाकडून याबाबत तडकाफडकी निर्णय घेऊन 15 मेपासून सबसिडी ग्राहकांच्या बॅंक खात्यात जमा होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु या कामात अनेक तांत्रिक समस्या निर्माण झाल्या असून त्या दूर झाल्यानंतर ही योजना सुरु केली जाईल असेल सांगण्यात येत आहे.

ग्राहकांच्या बँक खात्यात गॅसवरील सबसिडी जमा करण्याच्या कामात आधार क्रमांकाचा वापर केला जाईल. या माध्यमातून वेगवेगळ्या सरकारी योजनांचे पैसे आधीपासूनच लाभार्थींच्या खात्यात जमा होत आहेत. देशात 14 कोटी गॅसग्राहक आहेत.

योजनेनुसार वर्षाकाठी 9 सिलिंडरवर मिळणारी सुमारे 4 हजार रुपये सबसिडी ग्राहकांच्या खात्यांत जमा होईल. ही योजना एक जूनपासून देशातील 20 जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात येणार आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडियाने (यूआयडीएआय) 32 कोटी लोकांना आधार कार्ड दिले आहेत. यात 80 लाख बँक खाती आधारशी जोडली गेली आहेत. ग्राहकांना बँक खात्याशी आधार क्रमांक जोडावा लागेल. सिलिंडरची पूर्ण रक्कम दिल्यानंतर सबसिडीची रक्कम काही दिवसांनंतर खात्यात जमा होईल.