आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 मार्चपासून सर्वांनाच सवलतीचे गॅस सिलिंडर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - ‘आधार’ जोडणीपासून गॅस कनेक्शन वेगळे करण्याचे आदेश केंद्राने दिले आहेत. 10 मार्चनंतर सर्व एलपीजी ग्राहकांना 12 सिलिंडर सवलतीच्या दरांत मिळतील. कोणत्याही ग्राहकाचे सबसिडीचे पैसे आता बँकेत जमा होणार नाहीत.

केंदाने जानेवारीमध्ये गॅस आधार जोडणीपासून विलग करण्याची घोषणा केली. मात्र ग्राहकांना त्याचा फायदा मिळत नव्हता. गॅस क्रमांक आधार कार्डाशी लिंक केलेल्या ग्राहकांना बाजारभावाने गॅस सिलिंडर विकत घ्यावे लागत होते. सबसिडीची रक्कम बँक खात्यात जमा होत होती.