नवी दिल्ली/भोपाळ - पेट्रोल-डिझेल दरवाढीनंतर अनुदानित गॅस सिलिंडर 5.50 रुपयांनी महागले आहे, तर विनाअनुदानित सिलिंडरच्या दरात 16.50 रुपयांची वाढ करण्यात आली. सवलतीच्या सिलिंडरचे दर तर इतक्या गुपचूपपणे वाढवले की माध्यमांना ते समजले नाही. सवलतीच्या गॅसमध्ये दरवाढीची माहिती तेल कंपन्यांकडून एसएमएसद्वारे देण्यात आल्याचे इंडेन गॅसचे वरिष्ठ व्यवस्थापक (भोपाळ) एस. कुंजूर यांनी मान्य केले.
बातम्यांमुळे महागाई वाढली
बातम्यांमुळे वस्तूंची दरवाढ होत आहे. बातम्यांवरून व्यापारी साठेबाजी करत आहेत. महागाई कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. - रामविलास पासवान
(फोटो - संग्रहित छायाचित्र)