आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आधार’च्या आधारेच सिलिंडरचे अनुदान द्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली -आयआयटी कानपूरचे माजी संचालक एस. जी. डांडे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने एलपीजी सिलिंडर आधार क्रमांकासोबत लिंक करायला हवेत, अशा प्रकारची शिफारस केली आहे. एलपीजी अनुदानाची चोरी रोखण्यासाठी अशा उपक्रमाची गरज आहे.
त्याचबरोबर हे अनुदान थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविणेदेखील शक्य होणार आहे, असे या समितीचे मत आहे.

आधार लिंकिंगची पद्धत अत्यंत घाईगडबडीत राबवली गेली होती. ती चुकीची असल्यामुळे त्यात अनेक त्रुटी राहिल्या. या पार्श्वभूमीवर समितीने आधारद्वारे एलपीजीच्या वितरणात सुधारणा करण्यासाठी 30 मुद्दय़ांच्या आधारे काही सूचना, शिफारशी केल्या आहेत. परंतु या शिफारशी पेट्रोलियम मंत्रालय स्वीकारेल की नाही याबाबत समितीला साशंकता आहे.

भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आधार योजनेमुळे उद्भवणार्‍या अडचणींचा मुद्दा बनवला होता.