आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गॅस कंपनीला पंधरवड्यात जोडणी स्थलांतरित करावी लागेल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - तुम्ही जेव्हा अन्य शहरात स्थलांतरित होता तेव्हा गॅस जोडणी कशी मिळेल याची विवंचना तुम्हाला सतावत असते. अनेकदा या कामासाठी बरेच महिने वाट पाहावी लागते. मात्र, आता ही समस्या राहणार नाही. सरकारने या कामासाठी पंधरा दिवसांची मुदत ठरवून दिली आहे. याअंतर्गत गॅस एजन्सीला जोडणी स्थलांतराचा अर्ज प्राप्त झाल्यानंतर 15 दिवसांमध्ये ते काम पूर्ण करावे लागेल. यासंबंधीच्या कागदपत्रांची पूर्तता तातडीने होईल. हा नियम बंधनकारक केला जात आहे. याबरोबर चार शहरांत ‘डायल ए सिलिंडर’ योजना सुरू केली जात आहे. यामध्ये पाच किलोचे सिलिंडर बाजारभावानुसार घरपोच दिले जाईल. भारत पेट्रोलियमने टोल फ्री क्रमांक 1800224344 सुरू केला आहे.