आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

व्ही. के. सिंह वादात, लेफ्ट. जनरल रथ यांना लवादाची क्लीन चिट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - सुकना जमीन घोटाळा प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त लवादाने लेफ्टनंट जनरल पी. के. रथ यांना क्लीन चिट दिली. पूर्व कमांडचे तत्कालीन कमांडर तथा माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी बदल्याच्या भावनेतून रथ यांच्यावर कारवाई केल्याचा ठपकाही लवादाने ठेवला. दरम्यान, व्ही. के. सिंह यांनी लवादाचा निर्णय म्हणजे वैयक्तिक हल्ला असल्याची टीका केली आहे. ७७ पानी निकालात घोटाळ्याबाबत चकार शब्दही नाही, फक्त व्यक्तिगत हल्ले करण्यात आले आहेत. सरकारने या निर्णयाच्या विरोधात अपील करावे, अशी मागणी त्यांनी केली. प. बंगालमधील सुकना घोटाळा २००९ मध्ये समोर आला. रथ यांनी लष्कराच्या ३३ व्या कोअरचे कमांडर म्हणून सुकना छावणीजवळ ७० एकर जमिनीवर शैक्षणिक संस्था उभारण्यासाठी खाजगी बिल्डरला एनओसी दिली, असा आरोप त्यांच्यावर होता.