आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lt Col Niranjan Kumars Last Word Dad I Am On Operation

#Pathankot: 'डॅड मी ऑपरेशनवर आहे...' शहीद लेफ्टनंट कर्नलचे अखेरचे शब्द

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट कर्नल निरंजनकुमार पत्नी डॉ. राधिका आणि मुलगी विस्मयासोबत. (फाइल फोटो) ) - Divya Marathi
पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेले लेफ्टनंट कर्नल निरंजनकुमार पत्नी डॉ. राधिका आणि मुलगी विस्मयासोबत. (फाइल फोटो) )
नवी दिल्ली - 'डॅड मी ऑपरेशनवर आहे...' हे अखेरचे शब्द आहेत, पठाणकोट हल्ल्यात शहीद झालेल्या लेफ्टनंट कर्नल निरंजनकुमार यांचे. शनिवारी दुपारी त्यांना वडील शिवराजन ई. कुमार यांनी फोन केला होता. त्यानंतर त्यांचे वडील मुलगा पुन्हा फोन करेल याची वाट पाहात होते, मात्र रविवारी सकाळी निरंजनकुमार यांच्या वीरमरणाची बातमी येऊन धडकली आणि संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. सोमवारी बंगळुरुत शहीद कर्नलला अखेरचा निरोप देण्यात आला.

वडिलांना माहित नव्हते मुलगा दहशतवाद्यांना संपवण्याच्या मिशनवर होता..
शहीद कर्नल निरंजनकुमार यांचे वडील म्हणाले, 'मला माहित नव्हते की तो पठाणकोटमध्ये सुरु असलेल्या ऑपरेशनवर आहे. शनिवारी मी त्याला फोन केला तेव्हा त्याने, मी एका ऑपरेशनवर असल्याचे सांगत फोन कट केला होता. निरंजनला लहानपणापासून लष्करात जाण्याची इच्छा होती.'
35 वर्षांच्या निरंजनकुमार यांचा जन्म केरळमध्ये झाला होता. त्यानंतर त्यांचे कुटुंब बंगळुरुला स्थलांतरित झाले होते. निरंजन चार वर्षांचे असतान त्यांचे मातृछत्र हरवले होते. त्यांच्या कुटुंबात वडील, दोन भाऊ आणि एक बहिण, पत्नी डॉ. राधिका आणि 18 महिन्यांची मुलगी विस्मया आहे.
शहीद निरंजनकुमार यांची पोस्टिंग दीड वर्षांपूर्वी लष्कराच्या मद्रास इंजिनिअरिंग ग्रुपमधून नॅशनल सेक्युरिटी गार्ड (एनएसजी)मध्ये झाली होती. येथे त्यांची नियुक्ती बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडमध्ये झाली होती. रविवारी पठाणकोट एअरबेसवर मृतदहशतवाद्याच्या शरीरावर लावण्यात आलेले आयईडी निकामी करताना झालेल्या स्फोटात ते गंभीर जखमी झाले आणि हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, शहीद लेफ्टनंट कर्नल निरंजनकुमार यांचे PHOTOS...