नवी दिल्ली - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊन चोविस तास होत नाही तर, शिवसेनेने धमकीचे राजकारण सुरु केले आहे. पक्षाचे प्रवक्त आणि खासदार संजय राऊत यांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मुंबईतील मिठी नदीच्या प्रदुषणासंदर्भातील एका प्रश्नावर धमकीच्या स्वरात म्हटले, 'चला मी तुम्हाला घेऊन जातो आणि मिठीमध्येच बुडवतो. तुम्ही फालतू प्रश्न विचारू नका.' हे उत्तर ऐकून प्रश्नकर्त्याने मला संरक्षण हवे असल्याचे म्हटले आहे. राऊत यांच्या या उत्तराने कार्यक्रमामध्ये सहभागी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला. निवडणुकीआधीच शिवसेना धमकीची भाषा करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुंबईमध्ये स्वच्छतेची जबाबदारी बृहन्मुंबई महानगर पालिकेची (बीएमसी) आहे. महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे. त्यामुळे प्रश्नकर्त्याने मीठी नदीची स्वच्छता आणि प्रदुषणाबद्दल त्यांना प्रश्न विचारला होता. त्याआधी राऊत यांनी राज्यात भाजपसोबतच्या जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल असे सांगितले. ते म्हणाले, जागा वाटप हे आमचे घरातील भांडण आहे. ते लवकरच मिटवले जाईल.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, मिठीतील गाळाचे दृष्य.