आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एम. के. कौशिक भारतीय हॉकी संघाचे नवे कोच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - महिला हॉकीपटूंकडून ज्या व्यक्तीवर लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला होता त्या व्यक्तीची आता भारतीय पुरुष हॉकी संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली आहे. एम. के. कौशिक भारतीय हॉकी संघाचे नवे प्रशिक्षक आहेत. ऑस्ट्रेलियाचे मायकेल नोब्ज यांच्या जागी ते पदभार स्वीकारतील.


कौशिक यांच्यासमोर पहिली कसोटी पुढच्या महिन्यात मलेशियात होणा-या आठ देशांची आशिया चषक स्पर्धा असेल. या स्पर्धेचे विजेतेपद पटकावल्यास भारताला 2014 च्या वर्ल्डकपचे तिकीट मिळेल. 1980 मध्ये मॉस्को येथे ऑलिम्पिकमध्ये अखेरीस सुवर्णपदक जिंकणा-या भारतीय हॉकी संघाचे ते सदस्य होते. ‘मी प्रशिक्षणात विविध लोकांसोबत काम केले आहे. मला याचा ब-यापैकी अनुभव आहे. मी माझे सर्वश्रेष्ठ योगदान देण्याचा प्रयत्न करेन. पुढच्या वर्षी होणा-या वर्ल्डकमध्ये कशा प्रकारे प्रवेश मिळवता येईल यासाठी संघासोबत बसून मला गांभीर्याने काम करावे लागेल,’ अशी प्रतिक्रिया कौशिक यांनी व्यक्त केली.


ओल्टमॅस यांची मदत करणार : नोब्ज यांना काढल्यानंतर प्रशिक्षक झालेले कौशिक संघाचे हाय परफॉर्मन्स संचालक रोलेंट ओल्टमॅस यांना मदत करतील. ओल्टमॅस सध्या मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत असून त्यांच्यावर दुहेरी जबाबदारी असेल. आरोपातून निर्दोष मुक्तता : महिला हॉकीपटूंकडून लैंगिक अत्याचाराचा आरोप झाल्यानंतर कौशिक यांचे पद हातून गेले होते. मात्र, क्रीडा मंत्रालयाच्या चौकशीनंतर कौशिक यांची या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली आहे. आपण निर्दोष असल्याचे त्या वेळी कौशिक यांनी वारंवार म्हटले होते.