आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आणखी एक रोहित... JNU मध्ये विद्यार्थ्याने घेतला गळफास, भेदभावाने होता त्रस्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली- जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील (जेएनयू) MPhil चे शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मुतुकृष्णन असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. विद्यापीठात समानतेची वागणूक नसल्याचा आरोप मुतुकृष्णने त्याच्या अखेरच्या फेसबुक पोस्टमध्ये केला आहे.
 
सोमवारी मित्राच्या खोलीत जाऊन मुतुकृष्णनने गळफास घेतला त्यात त्याचा मृत्यु झाला. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. तणावामुळे मुतुकृष्णनने आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. दरम्यान, डाव्या आणि पुरोगामी विचारांच्या संघटनांनी आणखी एका रोहितचा प्रशासनाने बळी घेतल्याचा आरोप केला आहे. 

सोमवारी रात्री मुतुकृष्णन मित्राकडे जेवायला आला होता. मित्राच्याच खोलीत तो झोपायला गेला. त्याने खोलीत स्वतःला बंद करून घेतले आणि गळफास घेऊन आत्महत्या केली. मुतुकृष्णनच्या मित्राने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुतुकृष्णनचा फोन बंद होता, अशी माहिती त्याच्या मित्रांनी दिली आहे.

जेएयूमधील विद्यार्थ्यांनुसार मुतुकृष्णन हा मागासवर्गीय होता. तो हैदरबाद विद्यापीठाचा माजी विद्यार्थी होता. रोहित वेमुलाच्या मृत्युनंतर मुतुकृष्णनचा दलित आंदोलनांमध्ये सक्रीय सहभाग होता. तो मुळचा तामिळनाडूतील सलेम येथिल रहिवाशी असून जेएनयूमध्ये MPhil शिकत होता. 'जॉइंट अॅक्शन कमिटी फॉर सोशल जस्टिस'च्या एका सदस्याने या घटनेवर दुख: व्यक्त केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, 'मुतुकृष्णन एक हुशार विद्यार्थी होता. दलित आंदोलनात त्याचा सक्रीय सहभाग असायचा. रोहित वेमुलाच्या आईवर त्याने सुंदर लेखसुद्धा लिहिला होता.' मुतुकृष्णनने आत्महत्या केली याचे आश्यर्य त्यांनी व्यक्त केले आहे.

फेसबुकवर शेवटची पोस्ट...
मुतुकृष्णनने आत्महत्येपुर्वी फेसबूकवर शेवटची पोस्ट लिहिली होती. त्यात त्याने म्हटले आहे. की, 'जर समानता नसेल तर काहिच नाही. MPhil आणि पीएचडी प्रवेशासाठी कोणतीही समानता दिसत नाही. व्हायवामध्येही बरोबरी नाही, फक्त समानतेचा दिखावा केला जातो. प्रशासकीय भवनात विद्यार्थ्यांना निदर्शने करू दिली जात नाही. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची बरोबरी नाही.' 

विद्यापीठातील विद्यार्थी मुतुकृष्णनच्या आत्महत्येवर शॉक् आहेत. हैद्राबाद विद्यापीठाचे माजी विद्यार्थी विन्सेट बेनी यांनी फेसबुकवर लिहिले की, 'अत्यंत ह्रदयद्रावक घटना आहे. देव त्याच्या आत्म्याला शांती देओ. मला नाही माहित तु हे पाऊल का उचलले. तु अनेक अडचणींचा सामना करून शिक्षण घेतले होते. मला तुझ्याकडून अशी अपेक्षा नव्हती.' मुतुकृष्‍णन मित्रांमध्‍ये तसेच फेसबुकवर रजनी कृष या नावाने ओळखला जायचा.

अति तणावामुळे मुतुकृष्णनने आत्महत्या केली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा, जेएनयूमध्‍ये प्रवेश मिळाल्‍यानंतर मुतुकृष्‍णनची पहिली फेसबुक पोस्‍ट... 
 

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...