आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Madame Tussauds Send A Invitation To Kerjriwal For Wax Statue

अरविंद केजरीवाल मेणाचे? मॅडम तुसाद वॅक्स म्युझिअमने पाठवले इन्व्हिटेशन!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा लवकरच मेणाचा पुतळा उभारण्यात येणाची शक्यता आहे. मॅडम तुसाद वॅक्स म्युझिअमने या संदर्भात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी आमंत्रित केले आहे. केजरीवाल यांनी हे आमंत्रण स्विकारले तर मॅडन तुसाद म्युझिअममध्ये मेणाचा पुतळा उभारण्यात येणार आहे. मेणाचा पुतळा असणारे केजरीवाल हे पहिले भारतीय मुख्यमंत्री ठरणार आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, अरविंद केजरीवाल यांनी आमंत्रण स्विकारावे, अशी विनंती देखील मॅडम तुसाद वॅक्स म्युझिअमतर्फे करण्यात आली आहे.

पुढील वर्षी दिल्लीत सुरु होणार म्युझिअम..
- लंडन येथील मॅडम तुसाद म्युझिअमचे इंडियन पार्टनर विजक्राफ्ट एंटरटेनमेंट इंटरनॅशनल (डब्ल्यूईआय) ने केजरीवाल यांना 11 जानेवारीला इन्व्हिटेशन पाठवले आहे.
- पुढील वर्षी दिल्लीत मॅडम तुसाद म्युझिअम सुरु होणार आहे.
- म्युझिअमची क्रिएटिव्ह टीमने फेब्रुवारीमध्ये केजरीवाल यांच्या पुतळ्यासाठी माप घेण्याची तयारी केली आहे.
- केजरीवाल यांनी आमंत्रण स्विकारल्यास दिल्लीत सुरु होणार्‍या मॅडम तुसाद वॅक्स म्युझिअममध्ये त्यांचा मेणाचा पुतळा ठेवण्यात येणार आहे.
- केजरीवाल यांनी दिल्लीच्या राजकारणात अभूतपूर्व यश संपादन केल्यामुळे त्यांचा म्युझिअमतर्फे त्यांना सन्मानित करण्‍यात येणार आहे.

'आप' सरकारने दिला दुजोरा..
- डब्ल्यूईआयतर्फे इन्व्हिटेशन मिळल्याच्या वृत्ताला 'आप' सरकारने दुजोरा दिला आहे.
- दिल्लीचे सांस्कृतिक मंत्री कपिल मिश्रा यांनी सांगितले की, दिल्ली येणार्‍या पर्यटकांसाठी मॅडम तुसाद म्युझिअम आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल. म्युझिअममध्ये पर्यटकांना मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या मेणाचा पुतळा (वॅक्स स्टॅचू) पाहायला मिळेल.
- सूत्रांनी सांगितले की, म्युझिअमसाठी जागा व परवाण्यासाठी दिल्ली सरकारची परवानगी घेणे आवश्यक आहे.

काय म्हणाले डब्ल्यूईआयचे डायरेक्टर?
- डब्ल्यूईआयचे डायरेक्टर आंद्रे टिमिन्स यांनी सांगितले की , 2017 पर्यंत दिल्लीत मॅडम तुसाद म्युजिअम सुरु होणार आहे.

या देशात आहे म्युझियम?
- युरोप, आशिया, अमेरिका व ऑस्ट्रेलियातील 20 शहरांमध्ये म्युझिअम आहे.
- महात्मा गांधी, इंदिरा गांधी, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, शाहरुख खान, सलमान खान, ऐश्वर्या राय- बच्चन, करीना कपूर, माधुरी दीक्षित व ऋतिक रोशनचा मेणाचा पुतळा आहे.

कोण आहेत मॅडम तुसाद?
- मॅडम तुसाद या फ्रान्सची महाराणी मेरी एंतोनियोतच्या पर्सनल ड्रेस डिझायनर होत्या. मेरी एंतोनियोत या फ्रान्सचे किंग लुई सोलहवें यांची पत्नी होती.
- वॅक्स मॉडलिंग मॅडम तुसाद यांचा फॅमिली बिझनेस होता.

पुढील स्लाइडवर पाहा, मॅडम तुसाद वॅक्स म्युझिअममध्ये कोणा-कोणाचे आहेत मेणाचे पुतळे...