आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नेस्लेचा उद्योग उघड, जाहिरातींवर ४४५ कोटी रुपये गुणवत्तेसाठी केवळ १९ कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - खाद्यपदार्थांच्या उत्पादनाचा दर्जा कायम ठेवण्यासाठी त्याच्या गुणवत्तेचे परीक्षण महत्त्वाचे ठरते, परंतु नेमके याच गोष्टीकडे नेस्ले कंपनीने दुर्लक्ष करून आपला बेजबाबदारपणा दाखवून दिला आहे. कारण मॅगी नूडल्सच्या जाहिरातींवर भरमसाट ४४५ कोटी रुपये खर्च केले आहेत, परंतु गुणवत्ता परीक्षणावर मात्र केवळ १९ कोटी रुपये खर्च केले. अर्थात फक्त ५ टक्के.
गेल्या पाच वर्षांपासून नेस्ले कंपनीने जाहिरातबाजी करण्यात कोठेही काहीच कमी पडू दिले नाही. त्यांच्या ‘अॅडव्हर्टायझिंग आणि सेल्स प्रमोशन’ चा खर्च सुमारे ३०० ते ४५० काेटी रुपयांच्या घरात होता. परंतु गुणवत्ता चाचणीचा आकडा काही वर्षांत १२ ते २० कोटींदरम्यान राहिला आहे. परंतु कंपनीने कर्मचाऱ्यांवरील खर्चात वाढ झाल्याचे दाखवून दिले होते. त्यानुसार २०१० मध्ये ४३३ कोटी खर्च झाला होता. मॅगीची भारतातून सहा देशात निर्यात केली जाते. दरम्यान, केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी नूडल्स सोबत पास्ताच्या उत्पादनांचा देखील तपास करण्यात येईल, असे रविवारी स्पष्ट केले.
गोव्यात मॅगीच्या िवक्रीवर बंदी
पणजी - नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेचा विचार करून गोवा सरकारनेदेखील मॅगीच्या विक्रीवर राज्यात बंदीचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांनी ही घोषणा केली. अनेक राज्यांनी मॅगीवर बंदी घातली आहे. दिल्ली, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, पंजाब, गुजरात, मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा त्यात समावेश आहे. त्याअगोदर एफएसएसएआयने शुक्रवारी मॅगी नूडल्स आरोग्यासाठी घातक असल्याचे स्पष्ट केले होते.
‘कीप काम अँड ईट मॅगी’ व्हॉट्सअॅपवर मोहीम
मॅगीच्या रिकॉलमुळे नामुष्की आेढवलेल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मात्र रविवारी व्हॉट्सअॅपवर एक मोहीम हाती घेतली आहे. त्यात मॅगीचे समर्थन करण्यात आले आहे. कर्मचाऱ्यांनी या पीआर वर्कसाठी ‘कीप काम अँड ईट मॅगी’ या शब्दांचा फोटो व्हायरल केला आहे.
...तरीही जुने नाते घट्ट
^नेस्लेवर टीका होत आहे. परंतु देशात ग्राहकांची सर्रास फसवणूक करणारे अनेक ब्रँड आहेत. त्यांची ग्राहकांशी कसलीही बांधिलकी नाही. परंतु मॅगीचे तसे नाही. लोकांना हा ब्रँड त्यांच्या रोजच्या जीवनात हवा आहे. कारण नेस्लेचे गेल्या ३२ वर्षांपासून ग्राहकांशी नाते बनलेले आहे. ते घट्ट आहे. हा कंपनीच्या पुढील वाटचालीसाठी एक सकारात्मक घटक ठरू शकतो.
संतोष देसाई, सीईआे, फ्युचर ब्रँड्स.
बहरीनमध्ये आयातीवर बंदी
आखाती देशांतील ३० बेटांवरील देशांपैकी असलेल्या बहरीनने मॅगीच्या आयातीवर रविवारी तात्पुरते निर्बंध घातले. कॅनडाने देखील मॅगीची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. केनियातही मॅगीची निर्यात होते.
हाच ट्रेंड इतर कंपन्यांमध्येही
दर्जा चाचणीच्या प्रयोगशाळांवर पुरेसा खर्च करण्याऐवजी जाहिरातबाजी करण्याचा ट्रेेंड नेस्लेसोबतच इतर अनेक कंपन्यांत पाहायला मिळू शकतो, असा दावा या क्षेत्रातील जाणकार करतात.
चेअरमनचा संदेश ‘गुड फूड, गुड लाइफ’
नेस्ले इंडियाचे अध्यक्ष हेलिआे वाझ्क आणि व्यवस्थापकीय संचालक एटीन बेनेट यांनी लिहिलेला ‘गुड फूड, गुड लाइफ’अशी घोषणा करणारा लेख वार्षिक अहवालात प्रकाशित झाला आहे. आरोग्य सुरक्षेवरून नेस्ले कंपनी टीकेचे लक्ष्य झालेली असतानाच हा निव्वळ योगायोग मानला तरी कंपनीची मोहीम अडचणीत सापडली आहे.
बातम्या आणखी आहेत...