आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maggi Noodles Likely To Face Ban In India Fssai Orders Sample Examination

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बिग बी, माधुरी, प्रितीवर बिहारमध्येही FIR, कोर्ट म्हणाले, गरज असल्यास अटक करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : अमिताभ बच्चन - Divya Marathi
फाइल फोटो : अमिताभ बच्चन
नवी दिल्ली - मॅगी प्रकरणात बिहारच्या मुजफ्फरपूर कोर्टाने अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित, प्रिती झिंटा आणि नेस्ले कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात FIR दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सोमवारी एका वकिलाने मॅगीमध्ये घातक रासायनिक पदार्थ असल्याप्रकरणी कोर्टात अर्ज दाखल केला होता. त्यात अमिताभ, माधुरी आणि प्रितीच्या विरोधात IPC च्या कलम 270, 272, 273, 275, 276 आणि 420 च्या अंतर्गत खटले दाखल करण्याचे आदेश द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. मंगळवारी एसीजेएम वेदप्रकाश सिंह यांनी त्यांच्यावर FIR दाखल करण्याचे आदेश दिले. मुजफ्फरपूरच्या काझी मोहम्मदपूर ठाण्यात FIR दाखल करण्यात येणार आहे.

सेलिब्रिटीजसह नेस्लेच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांची या प्रकरणी चौकशी सुरू केली जावी आणि गरज पडल्यास या सर्वांना अटकही करावी असे आदेश कोर्टाने दिले आहेत. युपीमधील मॅगीचे नमुने सदोष असल्याचे समोर आल्यानंतर हा अर्ज करण्यात आला होता. तपासणीत मॅगीमध्ये धोकादायक पातळीपर्यंत लेड आणि एमएसजी असल्याचे आढळून आले होते. अमिताभ, प्रिती आणि माधुरी मॅगीची जाहिरात करतात.

दरम्यान, अमिताभने एका इंग्रजी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, मी नेस्ले कंपनीकडे मॅगी संपूर्ण आरोग्यदायी आहे का? याची विचारणा केली होती. तसेच जाहिरातीच्या करारातही मी एक मुद्दा जोडला होता, त्यात या जाहिरातीचा कायदेशीर पेच असल्यास कंपनी माझा बचाव करेल असा उल्लेख त्यात करण्यात आला होता. सध्या माझा मॅगीबरोबर करार संपला असून सध्या मी त्यांच्यासाठी जाहिरात करत नाही, मी निर्दोष आहे. अशा शब्दांत त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले. सोमवारी दिलेल्या या मुलाखतीत अमिताभ म्हणाले की, मी एक सेलिब्रिटी आहे. त्यामुळे माझे नाव वादांमध्ये ओढले जाते. तसे होऊ नये यासाठी मी खाद्य पदार्थांच्या जाहिराती करण्यापूर्वी स्वतः खात्री करून घेत असतो.

मॅगीची जाहिरात केल्या प्रकरणी अमिताभ, माधुरी आणि प्रितीच्या विरोधात शनिवारी युपीच्या बाराबंकी कोर्टात खटला दाखल करण्यात आला होता. माधुरीच्या आधी अमिताभ मॅगीची जाहिरात करायचे. 2013 मध्ये हरिद्वार फूड डिपार्टमेंटकडून नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी मॅगीची जाहिरात करणे बंद केले.