आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Maggi's Brand Ambassadors Also Convicted Centre Government

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मॅगीच्या ब्रँड अॅम्बेसेडरलाही दोषी धरणार : केंद्र सरकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - मर्यादेपेक्षा जास्त प्रमाणात शिसे आणि मोनोसोडियम ग्लुटामेट आढळल्या प्रकरणी भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरण (एफएसएसएआय) विविध राज्यांतून गोळा केलेल्या मॅगी नूडल्सच्या आणखी नमुन्यांची तपासणी करत आहे. जाहिराती दिशाभूल करणाऱ्या आढळल्यास मॅगीच्या ब्रँड अॅम्बेसेडरलाही दोषी धरून कारवाई होईल, असे सरकारने स्पष्ट केले. मॅगीचे ब्रँड अॅम्बेसेडर अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित व प्रीती झिंटाविरुद्ध बाराबंकी न्यायालयात गुन्हा दाखल झाला आहे.

एफएसएसएआयच्या चाचणीचा अहवाल २-३ दिवसांत मिळणे अपेक्षित आहे. हे प्रकरण एफएसएसएआयकडे असून त्यावर तेच कारवाई करतील, असे केंद्रीय अन्न व ग्राहक कल्याण मंत्री रामविलास पासवान यांनी म्हटले आहे. मात्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाकडे अद्याप एकाही ग्राहकाकडून तक्रार करण्यात आली नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कारवाईबाबत अतिरिक्त ग्राहक कल्याण सचिव जी. गुरुचरण म्हणाले की, सर्व राज्यांतून एफएसएसएआयने नमुने घेतले आहेत.