आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahabharat Bheem Praveen Kumar Will Contest Delhi Assembly Elections From Wazirpur On Aam Aadmi Party Ticket

केजरीवालांचे सहा उमेदवार ठरले, \'महाभारता\'तील \'भीम\' प्रवीणकुमारला तिकिट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्‍ली- अरविंद केजरीवाल यांनी विधानसभेसाठी आम आदमी पक्षाच्‍या आणखी सहा उमेदवारांची घोषणा केली. या जागांमध्‍ये वजीरपूर, बादली, चांदणी चौक, मंगोलपुरी, पालम आणि गोंडाचा समावेश आहे. पक्षाने प्रसिद्ध टीव्‍ही अभिनेता आणि छोटया पडद्यावरील महाभारतातील 'भीमा'ची भूमिका निभावलेल्‍या प्रवीण कुमार यांना वजीरपूर भागातून निवडणुकीच्‍या मैदानात उतरवण्‍याचा निर्णय घेतला आहे. दिल्‍लीतील महत्‍वपूर्ण असलेल्‍या चांदणी चौक मतदार संघातून विक्रम बधवार यांना उमेदवारी देण्‍यात आली आहे. विक्रम यांनी अनेक व्‍यापारी संघटनांना एकत्रित आणून व्‍यापारांच्‍या हितासाठी काम केलेले आहे.

त्‍याशिवाय मंगोलपुरी येथे पक्षाने युवा पत्रकार राखी बिर्ला यांना निवडणूक रिंगणात उतरवण्‍याचा निर्णय घेतला आहे. तर बादलीमधून मोहनकृष्‍ण शर्मा, पालममधून सुनील पोखरियाल आणि घोंडा जागेसाठी लक्ष्‍मी नारायण शर्मा आगामी निवडणुकीत आम आदमी पक्षाचे उमेदवार असतील. पक्षाने एकूण 53 उमेदवारांच्‍या नावाची घोषणा केली आहे.