आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahabharta Bheem Praveen Kumar Contest Delhi Assembly Election From Wazirpur Seat

अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला सर्वाधिक निधी परदेशातून

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला (आप) परदेशातून मोठ्या प्रमाणात पक्षनिधी मिळत आहे. ऑनलाईन डॉनेशनच्या माध्यमातून हाँगकाँगच्या एका बँकरने आपला 50 लाख रुपये दान दिले आहेत. दिल्ली विधानसभा निवडणूकीत सत्ताधारी काँग्रेसला खाली खेचण्याची आपने जोरदार तयारी सुरु केली आहे. आतापर्यंत त्यांच्याकडे आठ कोटी रुपये जमा झाले आहेत. विधानसभा निवडणूकीसाठी आपने 20 कोटींचे बजेट तयार केले आहे. अजून 12 कोटींची त्यांना गरज आहे. पक्षाचे कार्यकर्ते घरोघर फिरून प्रचार आणि पक्षासाठी निधी जमा करत आहेत.
('आप'शी वाढत्या जवळीकीमुळे डॉ. योगेंद्र यादव यांना केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाची नोटीस)
आगामी दिल्ली विधानसभा निवडणूकीतील पक्षाचे उमेदवार लवकरच जाहीर केले जाणार आहेत. या पक्षाचे उमेदवार विद्यार्थी चळवळीतील नेते, चित्रपट आणि दुरचित्रवाणी कलाकार, एक माजी नगरसेवक, लष्करातील निवृत्त अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, इंजिनिअर, एमबीए, बांधकाम व्यवसायिक, टॅक्सी चालक आहेत.

वजीरपूर मतदार संघातून महाभारत मालिकेतील भीमाची व्यक्तिरेखा साकारणारे प्रवीणकुमार यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. उत्तमनगर मतदार संघातून नगरसेवक देशराज राघव आणि कारगिल युद्धातील शहीदांचे नातेवाइक आणि माजी लष्कर अधिका-यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.