आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रात ४३ स्वच्छ शहरे, स्वच्छतेच्या निकषांअंतर्गत राज्य आघाडीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- स्वच्छ भारत अिभयानाचे यशापयश पडताळण्यासाठी केंद्र सरकारने देशभर ४७६ शहरांत केलेल्या सर्वेक्षणानंतर स्वच्छ शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात महाराष्ट्रातील सर्वाधिक ४३ शहरांचा समावेश आहे. यापैकी नवी मुंबई शहर पहिल्या दहामध्ये तिसऱ्या स्थानी आहे. या सर्वेक्षणानुसार पहिल्या शंभर स्वच्छ शहरांमध्ये महाराष्ट्रातील ६ शहरांचा समावेश असून स्वच्छतेच्या निकषांअंतर्गत राज्याने आघाडी घेतली आहे.
गेल्या वर्षी मोदी सरकारने २ ऑक्टोबर रोजी स्वच्छ भारत अिभयान सुरू केले होते. यानंतर जवळपास दहा महिन्यांनी केंद्र सरकारने ऑगस्टच्या दुसऱ्या महिन्यात देशभरातील स्वच्छ शहरांची क्रमवार यादी जाहीर केली. केंद्रीय नगरविकास मंत्रालयाने आखून दिलेल्या निकषांनुसार या शहरांची निवड करण्यात आली असून या सर्वेक्षणासाठी देशभरातील १ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या एकूण ४७६ शहरांची निवड करण्यात आली होती.

देशांतील स्वच्छ शहरांची निवड केली जात असताना प्रत्येक राज्यातील विशिष्ट शहरांचीच यात नावे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत होता. त्यामुळे आपापल्या राज्यांतील स्वच्छ शहरे कोणती हे जाणून घेण्यासाठी नागरिकांत प्रचंड उत्सुकता होती.

राज्यातील स्वच्छ शहरांची अशी आहे क्रमवारी
जळगाव ४३
औरंगाबाद १९०
अकोला  २८६
नाशिक  ८०
सोलापूर २०१
अमरावती ३३८
अहमदनगर१६४
उस्मानाबाद २१५
बीड  ३९६
नवी मुंबई ३
अंबरनाथ २२
पुणे ३१
जळगाव ४३
पिंपरी-चिंचवड ९८
चंद्रपूर १०३
मीरा-भाईंदर १०६
वसई-विरार ११८
ग्रेटर मुंबई १४०
कोल्हापूर १५८
बदलापूर १७३
भिवंडी १८३
इचलकरंजी १८४
सातारा १९४
ठाणे २१३
सांगली-मीरज २३७
नांदेड-वाघाळा२४४
कल्याण-डोंबिवली २५१
नागपूर २५६
पनवेल २६४
भुसावळ २६७
नंदुरबार २७०
हिंगणघाट २७६
लातूर २८१
जालना ३०६
उल्हासनगर ३१७
बार्शी ३२०
यवतमाळ ३२३
परभणी ३३२
गोंदिया ३३३
वर्धा ३४४
मालेगांव ३६२
अचलपूर ३६३
उदगीर ३६८
धुळे ४०६