आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्रातील निकालाने काँग्रेसचा चेहरा पडला !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : नोटबंदीच्यान विरोधात विरोधकांनी पुकारलेल्या ‘आक्रोश दिना’मध्ये सोमवारी दिल्लीत विशेष दम दिसला नाही. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाचा कल भाजपच्या बाजूने येत असल्याचे दिसताच काँग्रेसच्या नेत्यांचे चेहरे पडलेले दिसत हाेते. तर जनसामान्यांना नाेटबंदीमुळे काहीच फरक पडलेला नाही हे या निवडणूक निकालाने स्पष्ट झाले. दुसरीकडे, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी मात्र महाराष्ट्रातील जनतेचे अाभार मानले अाहेत.
दिल्लीच्या रस्त्यांवर विराेधक काेणताही अाक्राेश करू शकले नाहीत. युवक काँग्रेस, विदयार्थी संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यांवर उतरले असले तरी ते दखलपात्र नव्हते. अधिवेशन सुरू झाल्यापासून एकही दिवस कामकाज झाले नाही. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल यायला लागले तसतसा विराेधकांना घाम फुटत गेला. नाेटबंदीचा परिणाम विराेधकांच्या मतपेट्यांवरच झाला. यामुळे संसदेत अाेरड निरर्थक असल्याच्या भावना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये दिसून येत हाेत्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशाेक चव्हाण अाणि प्रभारी माेहन प्रकाश यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
शिवसेनेचा विराेधी सूर कायम
आक्रोश दिनाचा देशात कोणताही परिणाम दिसत नसल्याचे नमूद करीत शिवसेनेचे आनंदराव अडसूळ म्हणाले, नाबार्डतर्फे जिल्हा सहकारी बँकांमध्ये २१ हजार कोटी रुपये देणार असल्याची घाेषणा अद्यापही पूर्णत्वास अाली नाही. ही रक्कम सहकारी बँकांमध्ये पोहोचलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे हाल हाेत आहेत.
बातम्या आणखी आहेत...