नवी दिल्ली- आज (शुक्रवार) महाराष्ट्र दिन आहे. त्यानिमित्त देशाचे पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेतून शुभेच्छा दिल्या आहेत. '
ट्विटर अकाउंट'वर खास मराठीत संदेश देऊन महाराष्ट्राचा गौरव केला आहे.
महाराष्ट्राने राष्ट्राच्या विकासासाठी अभूतपूर्व योगदान दिले आहे. महाराष्ट्र ही थोर विचारवंत, संत आणि शूर-वीरांची ही भूमी आहे. महाराष्ट्रातील लोकांची कष्ट करण्याची वृत्ती सर्वपरिचित आहे. त्यामुळे सर्व मराठी बांधवांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!, असे पंतप्रधान मोदींनी
आपल्या संदेशात लिहिले आहे.