आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केंद्राने दिलेले 700 कोटी राज्याकडे पडून!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील दुष्काळासाठी केंद्र सरकारने 2013-14 या आर्थिक वर्षात राज्याला दिलेल्या एकूण निधीमधील 700 कोटी रुपये खर्चच केले नसल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी राज्यातील भाजपच्या नेत्यांच्या लक्षात आणून दिले. राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे. 15 टक्के शेतकर्‍यांनी पेरण्या केल्या. बीज अंकुरले नसल्याने नुकसान होत आहे. मान्सून उशिरा आल्यास पेरणी उशिरा होईल आणि आणेवारी घटल्यास धान्याचे संकट उभे राहणार आहे.

यासाठी मंगळवारी भाजपचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, खासदार हंसराज अहिर,खासदार संजय काका पाटील, पाशा पटेल यांनी केंद्रीय कृषिमंत्री राधामोहनसिंह यांची भेट घेतली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत चर्चा करताना राज्यातील आघाडी सरकारने निधी खर्च केला नसल्याची बाब उघडकीस आली.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)