आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Governor Vidyasagar Rao, News In Marathi

राज्यपाल राव यांनी घेतली नांदेडमध्ये बीएस्सीची पदवी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्राचेनवनियुक्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी आपले शिक्षण महाराष्ट्रात झाल्याचे सांगून या राज्याशी असलेल्या नात्यास उजाळा दिला. शनिवारी ते राज्यपालपदाची शपथ घेणार आहेत. त्याआधी त्यांनी दिल्लीत त्यांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या.

राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर सी. विद्यासागर राव हे दिल्लीत होते. गेल्या दोन दिवसांपासून ते अनेक नेत्यांना भेटत आहेत. आज नवीन महाराष्ट्र सदनातील त्यांच्या कक्षात आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्या वेळी ते म्हणाले, अापले शिक्षण ज्या राज्यात झाले तेथील राज्यपाल होत असतानाचा आनंद हाेत आहे. तेलंगण राज्यातील करीमनगर येथील राव यांनी नांदेड येथून बीएस्सी पदवीचे शिक्षण घेतले. बुधवारी राजभवनातील अधिकाऱ्यांनी राव यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. राव यांना शपथविधीचे िनमंत्रण देण्यासाठी राजभवनातील उपसचिव परिमल सिंग, सौरभ त्रिपाठी हे हैदराबादला रवाना झाले आहेत.

राव यांनी बुधवारी नितीन गडकरी प्रकाश जावडेकर यांच्याशी भेटून राज्यातील विविध विषयांवर चर्चा केली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांचीही राव यांनी आवर्जून भेट घेतली. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही निवड झाल्याकडे लक्ष वेधले असता त्यांनी मला महाराष्ट्र ठावुक आहे. मी येथे बरीच वर्षे राहिलो आहे. तसेच मी अनेकदा इथे आलो आहे. तेथील प्रश्नांची माहिती आहे. माझ्यावर कोणी अंगुलीनिर्देश करणार नाही याची खात्री आहे. घटनेच्या चौकटी ओलांडण्याचा प्रश्नच नाही, सर्वांना सोबत घेऊन चालण्याला तसेच राज्याच्या विकासालाच आपले प्राधान्य राहील, असे स्पष्ट केले.