आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुलांच्या लैंगिक शोषणामध्ये महाराष्ट्र, गुजरातची आघाडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - देशाच्या पश्चिम भागातील राज्ये बाललैंगिक शोषणात आघाडीवर आहेत. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये प्रत्येक दुसरे मूल या शोषणाला बळी पडते, असे प्लॅन इंडिया स्टेट नामक स्वयंसेवी संस्थेने केलेल्या पाहणीत दिसून आले. ‘चिल्ड्रन इन डिफिकल्ट सरकम्स्टन्सेस’ नावाने हा अहवाल जारी करण्यात आलाय. अंदमान-निकोबार, बिहार, आेडिशा, छत्तीसगड, सिक्कीम, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये एकूण मानवी तस्करीच्या ६१% तस्करी होते. या राज्यांतून एकूण बेपत्ता मुलांच्या ४८% मुले बेपत्ता होतात.

उत्तर भारतीय राज्यांमध्ये बालविवाह ही सर्वात महत्त्वाची समस्या आहे. राजस्थानमध्ये २०-२४ वर्षे वयोगटातील ५७.६ महिलांचे बालविवाह झालेले आहेत. उत्तर प्रदेशात बालविवाहाचे प्रमाण ५४.९% आहे, तर हरियाणात २८% बालविवाह होतात. उत्तर प्रदेशात बालमजुरांची संख्या सर्वाधिक आहे. देशात आजघडीला ४.३ दशलक्ष बालमजूर असून पैकी १.८ दशलक्ष बालमजूर उत्तर प्रदेशात आहेत.
अशी घेतली माहिती
भारताच्या विविध राज्यांतील बालशोषणाविषयीची माहिती २००० सामाजिक संस्थाद्वारे संकलित करण्यात आली. यात काही सरकारी विभागांनी दिलेली आकडेवारीदेखील ग्राह्य धरण्यात आली आहे. २८ राज्ये आणि ४ केंद्रशासित प्रदेशांतून १५०० प्रतिनिधींनी माहिती विश्लेषण केले.
बातम्या आणखी आहेत...