आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्योग क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली, मुंबई- उद्योग क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीचा ओघ महाराष्ट्रात वाढत आहे. जानेवारी ते ऑगस्ट २०१५ या केवळ आठ महिन्यांच्या काळात राज्यात ५५ हजार ३०७ कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. या गुंतवणुकीतून १ लाख २३ हजार ७४० इतका रोजगार निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रात गेल्या आठ महिन्यांत स्वित्झर्लंड, जर्मनी, चीन, अमेरिका आणि तैवान या पाच देशांतील १८ कंपन्यांनी एकूण ५५ हजार ३०७ कोटींची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीतून राज्यात १ लाख २३ हजार ७४० इतकी रोजगारनिर्मिती झाली आहे. स्वित्झर्लंडच्या हिल्टी, कॉग्निझंट, टोरे, ह्योसंग, शिंदलर, जनरल इलेक्ट्रिक्स या सहा कंपन्यांनी मिळून ५ हजार ३१० कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात केली आहे.

जर्मनीच्या आयकेईए व थायसेनकृप या दोन कंपन्यांनी दाेन हजार कोटी, तर चीनच्या फॉक्सकॉन, हेरर, हाकब्रश, तैयुवान हेवी इंडस्ट्री कंपनी लिमिटेड या चार कंपन्यांनी राज्यात १ हजार ५९७ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अमेरिकेच्या पंचशील-ब्लॅकस्टोन, कोकाकोला, जनरल मोटर्स व सिटी बँक या चार कंपन्यांनी ११ हजार ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

तैवानच्या फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी या कंपनीने महाराष्ट्रात ३५ हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. यातून ५० हजार रोजगार निर्मिती होईल. ही गुंतवणूक चाकण, पुणे, रांजणगाव, चिपळूण, या भागात होेत आहे.

१ लाख रोजगारनिर्मिती
महाराष्ट्रात गेल्या आठ महिन्यांत झालेल्या गुंतवणुकीमुळे १ लाख २३ हजार ७४० इतका रोजगार निर्माण होईल, असा अंदाज आहे. अमेरिकेची सिटी बँक पुण्यात ४ हजार रोजगार निर्मिती करणार आहे, तर स्वित्झर्लंडची एसक्यूएस ही कंपनीही पुण्यात ४ हजार रोजगार उपलब्ध करणार आहे.