आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Karnataka Border Issue In Loksabha, News In Marathi

येळ्ळूरप्रकरणी लोकसभेत खंडाजंगी; महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नावर सेना-भाजपमध्ये जुंपली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्र- कर्नाटक सीमाप्रश्नावरून आज (बुधवार) सकाळी लोकसभेत शिवसेना-भाजपमधील खंडाजंगी पाहायला मिळाली. बेळगावमधील मराठी भाषिकांवरील कर्नाटक पोलिसांने केलेल्या लाठीमाराचा मुद्दा शिवसेना खासदारांनी उपस्थित केला. त्याला फाटा फोडत बेळगाव हा कर्नाटक राज्याचा अविभाज्य घटक असल्याचे कर्नाटकातील भाजपच्या खासदारांनी सांगितले. नंतर शिवसेनेच्या खासदारांनी कर्नाटक सरकारविरोधात लोकसभेत प्रचंड घोषणाबाजी केली. त्यामुळे सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते.

येळ्ळूरमध्ये महाराष्ट्र राज्याचा फलक हटवण्यात आल्यानंतर उद्‍भवलेला वाद बुधवारी लोकसभेत पोहोचला. कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर केल्याल्या अमानूष लाठीमार केला होता. शिवसेना खासदारांनी सीमाप्रश्न उपस्थित करत 'कर्नाटक पोलिस हाय हाय' अशी जोरदाख घोषणाबाजी केली कर्नाटक पोलिसांच्या लाठीमाराचे छायाचित्रही शिवसेनेच्या खासदारांनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना दाखवले. मात्र, कर्नाटकमधील भाजप खासदारांनी त्यावर हरकत घेतली. नंतर शिवसेना आणि भाजपचे खासदार आमने-सामने आल्यानंतर सभागृहाचे कामकाज तहकूब करण्‍यात आले.
लोकसभेच्या शून्यकाळात शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी येळ्ळूरप्रकरणी मुद्दा उपस्थित केला. ‘महाराष्ट्र राज्य येळ्ळूर’ हा फलक दुसर्‍यांदा उद्ध्वस्त करण्याच्या कारवाईला विरोध केल्यामुळे कर्नाटक पोलिसांनी मराठी भाषिकांवर अमानुष लाठीमार केला. पुरुषांसोबत महिला आणि चिमुरड्यांनाही टार्गेट केल्याचे सावंत यांनी सांगितले. मराठी भाषिकांच्या सुरक्षेचे काय? असा सवालही सांवत यांनी उपस्थित केला.