आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस कोठडीत मृत्यूंचे प्रमाण महाराष्ट्रात जास्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - पोलिस कोठडीमध्ये झालेल्या आरोपींच्या मृत्यूंचे प्रमाण महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. गेल्या तीन वर्षांत राज्यातील पोलिस कोठडीत ७३ जणांचे मृत्यू झाले आहेत. मात्र त्यातील केवळ नऊ प्रकरणांचे निस्तारण करण्यात आले आहे, तर ६४ प्रकरणांमध्ये कोठडीतील मृत्यूचे कारण काय आहे, याबाबत प्रकरणे प्रलंबित असल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री हरिभाई पारथीभाई चौधरी यांनी दिली.

महाराष्ट्रात पोलिस काेठडीत २०१२ मध्ये २०, २०१३ मध्ये २०, २०१४ मध्ये २६ आणि चालू वर्षी गेल्या चार महिन्यांत ७ आपींचा मृत्यू झाला आहे, तर याच काळात महाराष्ट्रातील न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या आरोपींची संख्या ३२७ आहे. न्यायालयीन कोठडीत सर्वाधिक मृत्यूंचे प्रमाण हे उत्तर प्रदेश राज्याचे आहे. या राज्यात ११४० आरोपींचा मृत्यू न्यायालयीन कोठडीत झाला आहे. उत्तर प्रदेशात तीन वर्षांतील पोलिस कोठडीतील ३८ मृत्यू झाले आहेत. त्या खालोखाल बिहार, पश्चिम बंगाल, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, आंध्र प्रदेश या राज्यांतही कोठडीतील आरोपींच्या मृत्यूंचे प्रमाण जास्त आहे.
पोलिसांकडून आरोपींवर कोणत्याही प्रकारचे अत्याचार होऊ नयेत याची काळजी घेण्यात येते. मानवाधिकारांचे उल्लंघन होणार नाही याबाबत त्यांच्यावर दडपण असते. ज्या आरापींचा
पोलिस कोठडीत मृत्यू झाला.

त्याबाबत मानवाधिकार आयोगाकडून अहवाल मागवला जातो. अनेक प्रकरणांत अायाेगाने मृत पावलेल्या आरोपींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचे आदेश दिले आहेत. गेल्या तीन वर्षांत पोलिस कोठडीत मृत्यू झालेल्या देशातील १०३ प्रकरणांमध्ये मानवाधिकार आयोगाने २ कोटी २० लाख रुपये मदतीचे आदेश दिले आहेत, तर न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या ३४६ प्रकरणांत ६ कोटी ६१ लाख रुपयांची मदत आरोपींच्या कुटुंबीयांना मिळवून दिली आहे.