आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्रामध्ये तृतीयपंथीय मतदारांची सर्वाधिक नोंद! निवडणूक आयुक्तांकडून कौतुक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - महाराष्ट्रातील राज्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने तृतीयपंथी आणि वेश्याव्यवसायातील व्यक्तींचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी उत्तम कार्य केले आहे, अशा शब्दात देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त डॉ. नसिम झैदी यांनी कौतुक केले.

दिल्लीत कॅनॉट प्लेस परिसरातील सेंट्रल पार्कमधे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या वतीने आयोजित मतदार महोत्सवाचे उदघाटन डॉ. झैदी यांच्या हस्ते झाले. उदघाटनानंतर त्यांनी देशभरातील विविध राज्यांच्या निवडणूक अधिकारी कार्यालयांच्या वतीने उभारण्यात आलेल्या तसेच विविध देशांच्या दालनांस भेट दिली.

डॉ. झैदी यांनी महाराष्ट्र निवडणूक अधिकारी कार्यालयाला केंद्रीय निवडणूक आयोगाने तृतीय पंथी आणि वैश्याव्यवसायातील व्यक्तींचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी सोपवलेली जबाबदारी राज्यातील कार्यालय उत्तम प्रकारे पार पाडले असल्याबाबत कौतुक केले. तृतीय पंथी आणि वैश्याव्यवसायातील व्यक्तींचा मतदानातील सहभाग वाढवण्याचे अवघड काम महाराष्ट्रातील विविध भागात उत्तम प्रकारे झाले असून पुढील वाटचालीसाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

या महोत्सवात महाराष्ट्र राज्य मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या वतीने ‘महाराष्ट्रात तृतीय पंथी आणि वेश्या व्यवसायातील व्यक्तींचा मतदानातील सहभाग’ या विषयाची माहिती देणारे दालन उभारले आहे. समाजातील या घटकांचा मतदानातील सहभाग वाढवण्यासाठी राबवण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दर्शवणारे आकर्षक कटआऊट, बॅनर्स, पोस्टर्स, फ्लेक्स, एलईडी डिस्प्ले, इलेक्ट्रॉनिक स्क्रीन या ठिकाणी लावण्यात आले आहेत. यासोबतच विविध प्रकाशनेही येथे उपलब्ध आहेत.

या महोत्सवात शनिवार दिनांक १६ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमात महाराष्ट्राच्या वतीने तृतीय पंथीय कलाकारांचा चमू कला सादर करणार आहे. महाराष्ट्र दालनात उपमुख्य निवडणूक अधिकारी शिरीष मोहोड, कक्ष अधिकारी प्रसाद कुलकर्णी, तहसीलदार मीनल दळवी, नायब तहसिलदार राज तवटे यांचा समावेश आहे.
बातम्या आणखी आहेत...