आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Sadhan, Inauguration Handed By President Of India

नव्या महाराष्ट्र सदनाचे आज दिल्लीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जीच्या हस्ते उदघाटन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- दिल्ली येथे नव्याने बांधण्यात आलेल्या महाराष्ट्र सदनाच्या इमारतीचे उदघाटन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते आज सायंकाळी 6 वाजता होत आहे.

दिल्ली येथील शिरमूर प्लॉट, कस्तुरबा गांधी मार्ग येथे हे सदन बांधण्यात आले आहे. यापूर्वी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते सदनाचे उदघाटन होणार होते. मात्र, काम अर्धवट राहिल्याने ते होऊ शकले नाही. अखेर आज हा सोहळा होत असून त्याला राज्यपाल के. शंकरनारायणन, गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, अवजड व उद्योग मंत्री प्रफुल्ल पटेल, कृषी राज्यमंत्री तारीक अन्वर, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यासह बहुतांश मंत्री, राज्यातील सर्वपक्षीय खासदार, आमदार उपस्थित राहणार आहेत.