आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्याच्या महिला खटले भरण्यात दुसऱ्या स्थानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- न्यायालयामध्ये जास्तीत जास्त खटले भरण्यात उत्तर प्रदेशातील महिला देशात अव्वल असून त्याखालोखाल महाराष्ट्रातील महिलांचा क्रमांक आहे. देशातील न्यायालयांत प्रलंबित २.१८ कोटी खटल्यांपैकी महिलांच्या खटल्यांचे प्रमाण ९.५८ टक्के असल्याचे सर्वोच्च न्यायालयाच्या ई- समितीने जाहीर केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले.

उत्तर प्रदेशातील महिलांनी ४,४०,९२७ तर त्याखालोखाल महाराष्ट्रातील महिलांनी २, ५५, १२२ खटले दाखल केलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी न्यायालयांत ६,९६,७०४ खटले दाखल केले. एकूण प्रलंबित २,१८, ५४, ९७० खटल्यांपैकी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रलबिंत खटल्यांची टक्केवारी १२.७७ आहेे.

प्रलंबित खटल्यांचा लवकर निपटारा करण्यासाठी केंद्र सरकारने द्रूतगती न्यायालयाने स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतला असून महिला, मुले आणि ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित खटले अशा द्रुतगती न्यायालयांत चालवण्याचा मानस आहे.