आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra State Election In October, Union Election Commission

५ ते ९ ऑक्टोबरदरम्यान विधानसभा निवडणूक? उद्या तारीख घोषीत होण्याची शक्यता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांची निवडणूक आयोगाने संपूर्ण तयारी केली आहे. सणांचे दिवस वगळता या निवडणुका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार गुरुवारी निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात केंद्र आणि राज्य गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चार बैठका झाल्या. मतदान दोन टप्प्यात व्हावे, असे राज्य निवडणूक आयोगाने कळवले आहे.

२८ ऑगस्ट रोजी निवडणुका जाहीर झाल्यास ५ ते ९ ऑक्टोबर दरम्यान मतदान होईल आणि २० ऑक्टोबर रोजी मतमोजणी होण्याची शक्यता आहे. परंतु गुरुवारी निवडणूक जाहीर न झाल्यास ऑक्टोबरच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात मतदान घेऊन मतमोजणी शेवटच्या आठवड्यात होईल, अशी माहिती निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिली.